नवी दिल्ली, 08 डिसेंबर : तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्यासह 14 लोक होते. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Mi-17V5 हेलिकॉप्टरमधील सर्व जखमींना अपघातस्थळावरून बाहेर काढण्यात आले आहे. सीडीएस रावत हे वेलिंग्टनमधील डिफेन्स स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. जनरल रावत यांच्या प्रकृतीबाबत तातडीने कोणतीही माहिती मिळालेली नाही. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने सांगितले.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये होते.
- जनरल बिपिन रावत, सीडीएस
- सौ. मधुलिका रावत
- ब्रिगेडियर एलएस लीडर
- लेफ्टनंट हरजिंदर सिंग
- एनके गुरसेवक सिंग
- एनके जितेंद्र सिंग
- एल/एनके विवेक कुमार
- एल/एनके बी. साई तेजा
- HAV सतपाल
प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी तमिळनाडूला गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर येथे येत असताना कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे.
कुन्नूर येथून बिपीन रावत हे दिल्लीला जाणार होते. मात्र, कुन्नूर येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत. असं म्हटलं जात आहे की, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे त्या परिसरात घनदाट जंगल आहे. या घटनास्थळावरचे फोटोज आणि व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Helicopter, Indian army