मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer: बांग्लादेशात अचानक हिंदूंंवर हल्ले कसे सुरू झाले? कोणाचा आहे कट? एका CCTV फुटेजने समोर आलं सत्य

Explainer: बांग्लादेशात अचानक हिंदूंंवर हल्ले कसे सुरू झाले? कोणाचा आहे कट? एका CCTV फुटेजने समोर आलं सत्य

बांगलादेशातलं धार्मिक एकोप्याचं वातावरण मुद्दामच बिघडवण्याचा प्रयत्न झाला आणि या घटनेच्या मुळापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे.

बांगलादेशातलं धार्मिक एकोप्याचं वातावरण मुद्दामच बिघडवण्याचा प्रयत्न झाला आणि या घटनेच्या मुळापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे.

बांगलादेशातलं धार्मिक एकोप्याचं वातावरण मुद्दामच बिघडवण्याचा प्रयत्न झाला आणि या घटनेच्या मुळापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे.

    ढाका, 21 ऑक्टोबर: दुर्गापूजेचा उत्सव सुरू झाला आणि बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदूंवर हल्ले सुरू झाले. या मुस्लीम देशात काही ठिकाणी हिंदूंना दुर्गापूजा ( करण्यापासून रोखण्यात आल्याच्या बातम्या आल्या. अचानक हा धार्मिक हिंसाचार शेजारी देशात कसा सुरू झाला? एवढे वर्षं गुण्या-गोविंदाने राहणाऱ्या शेजाऱ्यांच्या मनात विष कुणी पेरलं? बांगलादेशातलं धार्मिक एकोप्याचं वातावरण मुद्दामच बिघडवण्याचा प्रयत्न झाला आणि या घटनेच्या मुळापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे. या हिंसाचाराला जिथे सुरुवात झाली त्या दुर्गापूजा मंडपाचा CCTV VIDEO समोर आला आणि त्यामुळे पोलिसांना मोठा उलगडा झाला आहे.

    दुर्गापूजेत कुराण ठेवणारा माणूस सापडला

    बांगलादेशातील (Bangladesh) कुम्मिला इथे दुर्गा मातेच्या उत्सवासाठी उभारलेल्या मांडवामध्ये मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराणची प्रत ठेवणाऱ्या (Quran at Durga Puja pandal in Comilla) व्यक्तीची ओळख बांगलादेश पोलिसांना पटली आहे. पोलिसांनी माहिती दिली की त्या मांडवात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेजच्या माध्यमातून आम्ही ती कुराण ठेवणारी व्यक्ती कोण होती हे शोधून काढलं आहे.

    आता त्याला पकडण्यासाठी आम्ही त्वरेन शोधमोहीम (Search Operation) राबवत आहोत. दुर्गा पूजेच्या मांडवात कुराण ठेवणाऱ्या व्यक्तीचं नाव इकबाल हुसेन (Iqbal Hussain) आहे असंही पोलिसांनी सांगितलं.

    बांगलादेशातील धार्मिक एकोप्याचं वातावरण बिघडवण्यासाठी इकबालने कुराणची प्रत दुर्गा पूजेच्या मांडवात ठेवली होती. दुर्गा पूजेच्या मांडवात (Durga Pooja Pandal) कुराण ठेवल्याची बातमी कळाल्यानंतर बांगलादेशात तीव्र असंतोष निर्माण झाला. हिंदूंनी आपल्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल संताप व्यक्त केला होता. त्यानंतर कट्टर मुस्लिमांच्या बेकाबू जमावाने अनेक हिंदू मंदिरांमध्ये तोडफोड केली आणि यात 7 जणांना प्राण गमवावा लागला होता.

    ढाका ट्रिब्यून (Dhaka Tribune) वृत्तपत्राने पोलिसांच्या हवाल्याने सांगितलं की, इकबालला नोकरी नाही. तो इकडे-तिकडे भटकत असतो. त्याचा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. इकबालची आई अमिना बेगम यांनी आपल्या मुलाला अंमली पदार्थांचं (Drugs) व्यसन असल्याचं सांगितलं आहे. इकबाल त्यांच्याच कुटुंबातल्या वेगवेगळ्या सदस्यांना विविध पद्धतीने त्रास देत होता असंही अमिना बेगमनी पोलिसांना सांगितल्याचं ढाका ट्रिब्युनच्या वृत्तात म्हटलं आहे.

    कुमिल्ला भागात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत चार प्रकरणी गुन्हे दाखल केले असून 41 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी चौघं इकबालशी संबंधित आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. बांगलादेशचे गृहमंत्री (Home Minister Bangladesh) असादुज्जमान खान म्हणाले,‘ इकबाल सतत वेगवेगळ्या जागी जातोय. पोलिसांना हुलकावणी देतो आहे. इकबालला अटक केल्याकेल्या आम्ही या हिंसाचाराबाबत जी तथ्य आहेत ती जाहीर करणार आहोत. बांगलादेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या दंग्यांतील हिंसाचारासाठी आतापर्यंत 450 जणांना अटक करण्यात आली आहे.’

    धार्मिक हिंसाचार केल्याप्रकरणी 72 प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हिंसाचारात हजारो हिंदूंची (Houses and shops of Hindu) घरं आणि दुकानं मुस्लिमांच्या जमावाने लुटली आहेत. अनेक मंदिरं आणि दुर्गा पूजेचे मांडव या जमावाने उद्धस्त केले आहेत. दरम्यान, अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी विनंती या आयोगाने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना केली आहे. बांगलादेशात एकूण लोकसंख्येच्या केवळ 10 टक्के हिंदू (10 percent Hindu Population) राहतात.

    पोलिसांनी मुद्दाम दुर्गा पूजेच्या मांडवात कुराण ठेवणाऱ्या इकबालला शोधून काढलं की या कटामागचं सत्य उघडकीस येईल.

    First published:
    top videos

      Tags: Bangladesh, Hindu, Violence