मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Pakistani Rupee Value: कंगाल पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट, पाकिस्तानी रुपया नीचांकी पातळीवर; अजूनही घसरण सुरूच

Pakistani Rupee Value: कंगाल पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट, पाकिस्तानी रुपया नीचांकी पातळीवर; अजूनही घसरण सुरूच

पाकिस्तानची (Pakistan Rupee Crisis) स्थिती सर्वच बाबतींत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी कितीही आणि काहीही दावे केले, तरी प्रत्येक बाबतीत त्यांच्या देशाची अधोगती होत चालली आहे.

21 ऑक्टोबर: पाकिस्तानची (Pakistan Rupee Crisis) स्थिती सर्वच बाबतींत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी कितीही आणि काहीही दावे केले, तरी प्रत्येक बाबतीत त्यांच्या देशाची अधोगती होत चालली आहे.  परदेशी संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावर प्रतिबंध आल्याने पाकिस्तान एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. तिथल्या चलनाचं मूल्य (Pakistan Currency Value) रसातळाला चाललं आहे. पाकिस्तानी रुपया (Pakistani Rupee) अमेरिकी डॉलरच्या (US Dollar) तुलनेत आतापर्यंतच्या सर्वांत नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. पाकिस्तानी रुपयाचं मूल्य सध्या अमेरिकी डॉलरच्या तुलनेत अवघं 0.0058 डॉलर एवढंच आहे. म्हणजेच पाकिस्तानी रुपया सध्या अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 173.18 च्या पातळीवर पोहोचला आहे. ही घसरण बऱ्याच काळापासून चालत आली आहे. ही आतापर्यंतची नीचांकी पातळी असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानी रुपयाची भारतीय रुपयाशी तुलना केली, तर त्याचं मूल्य 0.43 रुपयांच्या आसपास असल्याचं दिसून येत आहे. वाचा-New IPO : 'या' ऑनलाईन कंपनीचा IPO पुढच्या वर्षी येणार? स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (State Bank of Pakistan) अर्थात पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेने देशाच्या विनिमय दरावरचा ताण कमी करण्यासाठी अनेक उपाय सुरू केले होते. त्यानंतरही पाकिस्तानी चलनाच्या घसरणीत काहीही सुधारणा झाली नाही. तिथल्या आर्थिक संकटाच्या (Pakistan Economical Crisis) पार्श्वभूमीवर डॉलरला असलेली मागणीही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानी चलनाच्या तुलनेत अमेरिकी डॉलरची स्थिती मजबूत होत आहे. वाचा-UAE मध्ये दीर्घकाळ वास्तव्याकरता Golden Visa ठरेल बेस्ट! बिझनेससाठीही फायदेशीर पाकिस्तान प्रत्येक क्षेत्रात अयशस्वी ठरत असल्याचं दिसून येत आहे. मोठं आर्थिक संकट हे त्याचं मूळ कारण आहे. पाकिस्तानला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परदेशी निधी गरज आहे. आगामी दोन वर्षांसाठी पाकिस्तानला 51.6 अब्ज डॉलर्स अर्थात तब्बल 3843 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची गरज आहे. पाकिस्तानच्या दारूण स्थितीबद्दल दी न्यूज इंटरनॅशनल (The News International) या तिथल्याच एका वृत्तपत्राने माहिती प्रसिद्ध केली आहे. या वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानला 2021-22मध्ये 23.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1764 कोटी रुपये आणि 2022-23मध्ये 28 अब्ज डॉलर्स एवढ्या बाह्य निधीची गरज आहे. पाकिस्तानला परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर निर्बंध लागू झाल्यानंतर पाकिस्ताना हे आर्थिक संकट निर्माण झालं आहे. जागतिक बँक (World Bank) आणि आशियाई विकास बँकेने (ADB) पाकिस्तानच्या अनेक मोठ्या योजनांसाठी आर्थिक मदतीवर निर्बंध घातले आहेत.
First published:

Tags: Pakistan, Pakistan share market

पुढील बातम्या