मराठी बातम्या /बातम्या /विदेश /बांग्लादेश मुस्लीम राष्ट्र नाही? हिंदू-मुस्लीम संघर्षावर ज्येष्ठ मंत्र्यांचं मत, पुन्हा बदलणार राज्यघटना

बांग्लादेश मुस्लीम राष्ट्र नाही? हिंदू-मुस्लीम संघर्षावर ज्येष्ठ मंत्र्यांचं मत, पुन्हा बदलणार राज्यघटना

बांग्लादेशनं आता मुस्लीम देश ही ओळख संपवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केल्याची (Bangladesh not a muslim country says minister) प्रतिक्रिया सरकारमधील वजनदार मंत्र्यांनी दिली आहे.

बांग्लादेशनं आता मुस्लीम देश ही ओळख संपवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केल्याची (Bangladesh not a muslim country says minister) प्रतिक्रिया सरकारमधील वजनदार मंत्र्यांनी दिली आहे.

बांग्लादेशनं आता मुस्लीम देश ही ओळख संपवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केल्याची (Bangladesh not a muslim country says minister) प्रतिक्रिया सरकारमधील वजनदार मंत्र्यांनी दिली आहे.

ढाका, 20 ऑक्टोबर : बांग्लादेशनं आता मुस्लीम देश ही ओळख संपवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केल्याची (Bangladesh not a muslim country says minister) प्रतिक्रिया सरकारमधील वजनदार मंत्र्यांनी दिली आहे. बांग्लादेश हा एक धर्मनिरपेक्ष देश (Bangladesh is secular country says minister) असून मुस्लीम राष्ट्राची ओळख संपवण्याची गरज असल्याचं मत देशाचे माहिती प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी व्यक्त केलं आहे. बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हसन यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.

बांग्लादेशात होतायत हिंदूंवर हल्ले

नवरात्रीपासून बांग्लादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होण्याच्या घटनांना सुरुवात झाली आहे. अगोदर समाजकंटकांनी नवरात्रोत्सव कार्यक्रमावर हल्ले केले होते. गेल्या आठवड्यात काही हिंदू कुटुंबीयांच्या घराला आगी लावण्याचे प्रकारही घडले होते. त्यानंतर बांग्लादेश सरकारनं पोलीस आणि सैन्याला रस्त्यावर उतरवलं असून हिंदूंच्या घरांना कडक सुरक्षाव्यवस्था देण्यात आली आहे.

राज्यघटनेकडे परतण्याची गरज

गेल्या काही वर्षातील शासकांनी धर्मनिरपेक्ष असणाऱ्या देशाला धार्मिक बनवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देशाचं मोठं नुकसान झालं. बांग्लादेश हा धर्मनिरपेक्ष देश असून पुन्हा एकदा 1972 च्या राज्यघटनेकडे वळण्याची गरज असल्याचं मत मंत्री मुराद हसन यांनी मांडलं आहे. शेख मुजीबुर रहमान यांनी तयार केलेल्या 1972 सालच्या राज्यघटनेला पुन्हा एकदा मान्यता देण्यात यावी आणि राज्यघटनेच्या आधारेच देशाचा कारभार चालवण्यात यावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

हे वाचा- दररोज FAST FOOD खाऊन तरुणी झाली अगडबंब, आईलाही लेक ओळखेना

इस्लाम हा देशाचा धर्म नाही

बांग्लादेशाच्या रक्तात स्वातंत्र्य असून इस्लाम किंवा कुठलाही धर्म हा देशाचा धर्म नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी चर्चा करून शेख मुजीबुर रहमान यांच्या स्वप्नातील देश उभा करू, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

बांग्लादेशात हिंदूंवरील हल्ले सुरूच असून देशाची ओळख धर्माच्या आधारावर असल्यामुळेच हे घडत असल्याचं मत हसन यांनी मांडलं आहे. देश कुठल्याही एका धर्माचा नसल्यामुळे कुणीही या देशावर मालकी सांगत अल्पसंख्याकांवर हल्ले करू नयेत, असा इशारा त्यांनी समाजकंटकांना दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Hindu, Muslim