मराठी बातम्या /बातम्या /explainer /Pulwama attack मध्ये वापरलेल्या स्फोटकातलं हे रसायन शेतीसाठी आहे संजीवनी!

Pulwama attack मध्ये वापरलेल्या स्फोटकातलं हे रसायन शेतीसाठी आहे संजीवनी!

पुलवामा हल्ल्यासाठी (Pulwama attack) दहशतवाद्यांनी अमेझॉनवरून (Amazon) रासायनिक पदार्थ मागवल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. यात अमोनियम नायट्रेटचा (ammonium nitrate) समावेश आहे. हा पदार्थ विध्वंसक असला तरी शेतऱ्यांसाठी (farming) संजीवनी आहे.

पुलवामा हल्ल्यासाठी (Pulwama attack) दहशतवाद्यांनी अमेझॉनवरून (Amazon) रासायनिक पदार्थ मागवल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. यात अमोनियम नायट्रेटचा (ammonium nitrate) समावेश आहे. हा पदार्थ विध्वंसक असला तरी शेतऱ्यांसाठी (farming) संजीवनी आहे.

पुलवामा हल्ल्यासाठी (Pulwama attack) दहशतवाद्यांनी अमेझॉनवरून (Amazon) रासायनिक पदार्थ मागवल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. यात अमोनियम नायट्रेटचा (ammonium nitrate) समावेश आहे. हा पदार्थ विध्वंसक असला तरी शेतऱ्यांसाठी (farming) संजीवनी आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 22 नोव्हेंबर: पुलवामा हल्ल्यासाठी (Pulwama attack) दहशतवाद्यांनी अमेझॉनवरून (Amazon) रासायनिक पदार्थ मागवल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. कन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स म्हणजेच (CAIT) केटने अमेझॉनवर गंभीर आरोप केले आहेत. कंपनीने यापूर्वीही नियमांचे उल्लघन केलं आहे. त्याबद्दल पूर्वीदेखील कंपनीवर टीका झाली होती. मात्र, आता हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे कंपनीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यात अमोनियम नायट्रेटचा (ammonium nitrate) समावेश आहे. हा पदार्थ विध्वंसक असला तरी शेतऱ्यांसाठी संजीवनी आहे.

पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये 2019 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवानांचा बळी गेला होता. राष्ट्रीय तपास संस्थेकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या हल्ल्यासाठी जी रसायनं दहशतवाद्यांनी वापरली, त्याची डिलिव्हरी अमेझॉन कंपनीकडून करण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेला अमेझॉनकडून याचे तपशील सादर करण्यात आले आहेत. विशेषतः भारतात बंदी असलेल्या अमोनियम नायट्रेटची डिलिव्हरीदेखील अमेझॉनवरून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतात बंदी असणारे पदार्थ अमेझॉनवरून कसे काय पुरवले जाऊ शकतात, असा आक्षेप उपस्थित करत कॅटनं कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अमोनियम नायट्रेट काय आहे? What is ammonium nitrate?

अमोनियम नायट्रेट हे पांढऱ्या रंगाचा दाणेदार पदार्थ आहे जो औद्योगिक स्तरावर मोठ्या प्रमाणात तयार केला जातो. नायट्रोजनचा स्रोत म्हणून खतासाठी त्याचा सर्वाधिक उपयोग होतो. पण यासोबतच याचा वापर खाण उद्योगासाठी स्फोटके तयार करण्यासाठीही केला जातो.

SHOCKING! पुलवामा हल्ल्यासाठीच्या रसायनांची Amazon वरून खरेदी, देशद्रोहाच्या खटल्याची मागणी

हे मूळ स्वरुपात आढळत नाही. कारण ही एक कृत्रिम प्रकारची गोष्ट आहे, जी अमोनिया आणि नायट्रिक ऍसिडच्या अभिक्रियाने तयार होते. अमोनियम नायट्रेटचे उत्पादन जगभरात केले जाते आणि ते खरेदी करणे स्वस्त आहे. परंतु, त्याचा साठा करणे धोकादायक अकते. यापूर्वी अमोनियम नायट्रेटमुळे अनेक मोठे व गंभीर अपघात झाले आहेत.

स्फोटामुळे निर्माण होणारा वायू किती धोकादायक?

जेव्हा अमोनियम नायट्रेटचा स्फोट होतो तेव्हा ते नायट्रोजन ऑक्साईड आणि अमोनियासारखे विषारी वायू सोडतात. केशरी रंगाचा धूर नायट्रोजन डायऑक्साइडमुळे तयार होतो. याचा अनेकदा वायू प्रदूषणाशी संबंध असतो. या विषारी वायूमुळे स्फोटाच्या परिसरात लोकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

Pulwama: पहिल्यांदाच समोर आले हल्लेखोरांचे फोटो, NIAच्या आरोपपत्रात पाकिस्तानचा पर्दाफाश

बॉम्ब तयार करण्यासाठी वापर?

शक्तिशाली स्फोटाची ताकद असलेल्या या रासायनिक संयुगाचा जगभरातील सैन्य स्फोटक म्हणून वापर करतात. अमोनियम नायट्रेटचा वापर अतिरेकी कारवायांमध्येही केला गेला आहे. पुलवाला हल्ल्यात याच रासायनिक पदार्थाचा वापर करण्यात आला होता. ज्यात 40 जवान शहीद झाले आहेत.

शेतीसाठी संजीवनी

अमोनियम नायट्रेट हे शेतीतील हरितक्रांतीचे इंधन आहे. विसाव्या शतकात लोकसंख्या खूप झपाट्याने वाढली होती, ज्याचे एक कारण म्हणजे विज्ञानाने अनेक प्राणघातक रोगांवर उपचार शोधले होते. कारखानदारीत काम करण्यासाठी लोक खेड्यातून शहरात येत होते. युरोपच्या शेतात एवढ्या लोकांचे पोट भरण्याइतके उत्पन्न नव्हते. शेतीतील उत्पादन वाढेल अशा जादुई खताची गरज होती.

पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली म्हणजे Farm Laws रद्द होत नाही! काय आहे घटनात्मक प्रक्रिया

खताची संकल्पनाही बदलली होती. मानवी आणि प्राण्यांचे मलमूत्र विघटन करणे आणि खत तयार करणे यापुढे पुरेसे नव्हते. जर्मन रसायनशास्त्रज्ञ जस्टस फॉन लीबिह यांनी 19 व्या शतकाच्या मध्यात हे सिद्ध केले की नायट्रोजन हे वनस्पतींसाठी सर्वात आवश्यक खत आहे. जस्टस यांना आधुनिक शेतीचे जनक म्हटले जाते. त्यांच्या शोधावर आधारित संशोधनात असेही समोर आले होते की आणखी दोन खते वनस्पतींसाठी अतिशय खास आहेत. हे फॉस्फरस आणि पोटॅशियम आहेत. ही दोन्ही खनिजे पृथ्वीवर आढळतात. मात्र, सर्वात मोठी अडचण होती नायट्रोजन मिळवण्यात. हवेत नायट्रोजन मुबलक आहे, पण, तो हवेतून काढून अशा रासायनिक रुपात आणणे, जो पिकांना देता येईल, याच मार्ग कोणाकडेच नव्हता.

1909 मध्ये, जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिट्झ हेबर यांनी हवेतून नायट्रोजन काढून अमोनिया तयार केला. त्यांच्या ऐतिहासिक शोधासाठी, त्यांना 1918 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. नंतर नायट्रोजन आणि अमोनिया यांच्या संयुगातून एक प्रभावी खत तयार करण्यात आलं. ज्याची जगभरातील हरित क्रांतीसाठी मोठी भूमिका आहे. आजही मोठ्या प्रमाणात याचा वापर होतो. याला आपल्या भाषेत युरिया असे म्हटले जाते. पण, सोबतच याचा दहशतवादी कारवायांमध्येही वापर होत आहे.

First published:
top videos

    Tags: Pulwama aatack, Pulwama Encounter