Home /News /national /

Pulwama: पहिल्यांदाच समोर आले हल्लेखोरांचे फोटो, NIAच्या आरोपपत्रात पाकिस्तानचा पर्दाफाश

Pulwama: पहिल्यांदाच समोर आले हल्लेखोरांचे फोटो, NIAच्या आरोपपत्रात पाकिस्तानचा पर्दाफाश

Pulwama attack : जैश चा प्रमुख मसूद अजहर याच्यासह 20 जणांना आरोपी करण्यात आलं आहे. 5 हजार पानांचं हे आरोपपत्र आहे.

    जम्मू 25 ऑगस्ट: सर्व देशाला हादरवून सोडणाऱ्या पुलवामा हल्ल्या प्रकरणी (Pulwama Terrorist attack) राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIAने वर्षभरानंतर आरोपपत्र दाखल केलं आहे. वर्षभरापूर्वी फेब्रुवारी महिन्यात पुलवामा इथं लष्कराच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेले कार आदळली होती. त्यात 40 जवान शहीद झाले होते. या प्रकरणी हल्लेखोर दहशतवाद्यांचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. त्याचबरोबर ज्या कारमध्ये स्फोटकं ठेवली होती त्या कारचाही फोटो समोर आला आहे. NIAने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पाकिस्तानने कसा कट रचला आणि हा हल्ला घडवून आणला याची सर्व कुंडलीच या आरोपपत्रात मांडण्यात आली आहे. जम्मूतल्या NIAच्या विशेष न्यायालयात हे आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्यात वापरण्यात आलेलं RDX हे पाकिस्तानातून आणलेलं होतं असंही NIAने म्हटलं आहे. यात जैश चा प्रमुख मसूद अजहर याच्यासह 20 जणांना आरोपी करण्यात आलं आहे. हल्ल्यात मारले गेलेले दहशतवादी मोहम्मद उमर फारूक आणि आदिल अहमद डार यांचाही या आरोपपत्रात समावेश आहे. तर या प्रकरणात हल्ल्यात मदत करणाऱ्या 6 जणांना अटक करण्यात आली होती. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. असा रचला होता कट दहशतवाद्यांनी बॉम्ब बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची चोरी केली होती. मोठा हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी दगडांच्या ढिगाऱ्यामधून सुमारे 500 जिलेटिन कांड्या चोरी केल्या होत्या. यासह त्यांनी जवळच्या दुकानातून अमोनियम नायट्रेट आणि अमोनियम पावडर कमी प्रमाणात विकत घेतली होती, जेणेकरून कोणालाही शंका येऊ नये. इतकंच नाही तर, आरडीएक्स पाकिस्तानकडून बऱ्याच वेळा थोड्या-थोड्या प्रमाणात मागवलं गेलं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या फॉरेन्सिक तज्ञांनी हल्ल्यात अमोनियम नायट्रेट, नायट्रोग्लिसरीन आणि आरडीएक्सचा वापर केल्याची पुष्टी आधीच केली होती. गृह मंत्रालयाच्या (एमएचए) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने हल्ल्यानंतर लगेचच सर्व पुरावे एकत्र केले होते. हे स्फोटक साहित्य कसं गोळा केलं आणि यामागे कोण होतं याची माहिती मिळाली. ते म्हणाले की, आरडीएक्स  पाकिस्तानातून भारतात पाठवण्यात आलं होतं. तर या हल्ल्यासाठी जैशचे दहशतवादी गुप्तपणे भारतात घुसले होते.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Pulwama aatack

    पुढील बातम्या