मराठी बातम्या /बातम्या /देश /

SHOCKING! पुलवामा हल्ल्यासाठीच्या रसायनांची Amazon वरून खरेदी, देशद्रोहाच्या खटल्याची मागणी

SHOCKING! पुलवामा हल्ल्यासाठीच्या रसायनांची Amazon वरून खरेदी, देशद्रोहाच्या खटल्याची मागणी

पुलवामा हल्ल्यासाठी (Amazon supplied chemicals used in bombs during Pulwama attack reveals investigation) दहशतवाद्यांनी अमेझॉनवरून रासायनिक पदार्थ मागवल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: पुलवामा हल्ल्यासाठी (Amazon supplied chemicals used in bombs during Pulwama attack reveals investigation) दहशतवाद्यांनी अमेझॉनवरून रासायनिक पदार्थ मागवल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. कन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स म्हणजेच (CAIT demands sedition charges on Amazon) केटनं अमेझॉनवर गंभीर आरोप केले असून कंपनीकडून वारंवार नियमांची आणि देशाच्या सुरक्षा निकषांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप केला आहे. गांजा आणि मारिजुआना यासारखे पदार्थ यापूर्वीदेखील अमेझॉनवरून विकण्यात आल्याचं सिद्ध झालं आहे. त्याबद्दल पूर्वीदेखील कंपनीवर टीका झाली होती. मात्र आता हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे कंपनीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये 2019 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात    40 सीआरपीएफ जवानांचा बळी गेला होता. राष्ट्रीय तपास संस्थेकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या हल्ल्यासाठी जी रसायनं दहशतवाद्यांनी वापरली, त्याची डिलिव्हरी अमेझॉन कंपनीकडून करण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

अमेझॉनने दिली माहिती

राष्ट्रीय तपास संस्थेला अमेझॉनकडून याचे तपशील सादर करण्यात आले आहेत. विशेषतः भारतात बंदी असलेल्या अमोनियम नायट्रेटची डिलिव्हरीदेखील अमेझॉनवरून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतात बंदी असणारे पदार्थ अमेझॉनवरून कसे काय पुरवले जाऊ शकतात, असा आक्षेप उपस्थित करत कॅटनं कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे वाचा - Amravati Violence: "... तर अमरावतीत 13 तारखेची घटना घडलीच नसती"

दहशतवाद्यांनीही दिली होती कबुली

दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवण्यासाठी अमेझॉनवरून आयईडी, बॅटरी आणि इतर साहित्याची खरेदी केली होती. त्याचबरोबर अमोनियम नायट्रेट आणि नायट्रोग्लिसरीन यांचाही पुरवठा करण्यात आला होता. याच्या आधारेच बॉम्ब बनवण्यात आला होता, असं तपासातून स्पष्ट झालं आहे.

देशद्रोहाचा खटला करण्याची मागणी

आपल्या देशातील जवानांचा जीव घेण्यासाठी कारणीभूत ठरलेले आणि देशात बंदी असलेले पदार्थ अमेझॉननं पुरवल्याचं पुराव्यानिशी सिद्ध होत असल्यामुळे कंपनीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी केली आहे. कुणालाही कुठल्याही गोष्टीचा पुरवठा करताना देशहिताचा विचार न करणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

First published:

Tags: Amazon, Pulwama aatack