• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटाने वाढवलं होतं स्पेनचं टुरिझम! वाचा अजब किस्सा

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटाने वाढवलं होतं स्पेनचं टुरिझम! वाचा अजब किस्सा

२०११ मध्ये आलेल्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाचं दिग्दर्शन जोया अख्तरने केलं होतं. तसेच अभिनेता हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ, नसिरुद्दीन शहा आणि कल्की कोचलीन सारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती.

 • Share this:
  मुंबई,10 ऑक्टोबर- बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे अनेक चित्रपट आहेत , ज्यांच्याशी संबंधित अनेक किस्से ऐकायला मिळत असतात. असाच एक किस्सा आहे 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' (Zindagi Na milegi Dobara) या चित्रपटासंबंधी. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाने स्पेनचं (Spain) टुरिझम वाढवलं होतं. वाटलं ना आश्चर्य? हो हे खरं आहे. बॉलिवूड चित्रपट म्हटलं की त्याच्यासोबत अनेक किस्सेसुद्धा ऐकायला मिळतात. प्रत्येक चित्रपटासोबत काही ना काही घडत असतं. २०११ मध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. या चित्रपटाने 'रोड ट्रिप'चा ट्रेंड सेट केला होता. या चित्रपटाने अनेकांना आयुष्याकडे नव्याने पाहण्याची संधी दिली होती. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवं असं यातून सुचवण्यात आलं होतं. या चित्रपटातील गाणी आणि संवाद सुपरहिट झाले होते. चित्रपटातील संवाद अनेकवेळा 'इन्स्पिरेशनल थॉट्स' म्हणून सोशल मीडियावर पाहायला मिळतात. जावेद अख्तर यांनी लिहिलेली आणि चित्रपटात फरहान अख्तर याने म्हटलेली ती शायरी 'दिलों मी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम' आजही ऐकून लोकांना आयुष्य सकारत्मक वाटू लागतं. (हे वाचा:आलिया भट्ट आणि इम्रान हाश्मी यांचे आहेत कौटुंबिक संबंध! पाहा काय आहे दोघांचं....) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर चांगली कमाई केलीच होती. मात्र या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. या चित्रपटाने स्पेनचं टुरिझम मोठ्या प्रमाणात वाढवलं होतं. या चित्रपटानंतर स्पेनच्या टुरिझममध्ये ३२ टक्के वाढ झाली होती. कारण 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट स्पेनच्या विविध ठिकाणी शूट करण्यात आला होता. स्पेन च्या Lloret de Mar beach, Alajar (Alájar) town, Bunol, Andulacia अशा अनेक सुंदर ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग करण्यात करण्यात आलं होतं. या चित्रपटानंतर या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या ३२ टक्क्यांनी वाढली होती. (हे वाचा:शाहरुखसोबत'कल हो ना हो'मध्ये झळकलेले ही चिमुकली झालीय 25 वर्षांची....) हा चित्रपट २०११ मध्ये आलेल्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाचं दिग्दर्शन जोया अख्तरने केलं होतं. तसेच अभिनेता हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ, नसिरुद्दीन शहा आणि कल्की कोचलीन सारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. तीन मित्रांपैकी एका मित्राच्या लग्नाच्या आधी रोड ट्रिपचं प्लॅनिंग केलं जातं आणि त्यांनतर प्रवासामध्ये आपल्या अनेक राहून गेलेल्या इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं जातं. प्रवासादरम्यान त्यांना कल्की आणि कतरिनासुद्धा भेटतात. या चित्रपटानंतर #रोड ट्रिप, #फ्रेंडशिप गोल, #कपल गोल,# ट्रॅव्हल्स गोल ट्रेंड करू लागले होते.
  Published by:Aiman Desai
  First published: