'कल हो ना हो' या चित्रपटात शाहरुख खान आणि प्रीती झिंटा सोबत झळकलेली बालकलाकार फारच लोकप्रिय झाली होती. आज हि मुलगी २५ वर्षांची झाली आहे. ती आज कशी दिसतेय हे आपण पाहणार आहोत.
ती बालकलार झलक शुक्ला ही होती. तिची आई एक अभिनेत्री आहे. त्यांचं नाव सुप्रिया शुक्ला असं आहे. त्या कुमकुम भाग्य या मालिकेत प्रग्याची आई अर्थातच सरलाच्या भूमिकेत आहेत. तसेच झलकचे वडील एक डॉक्युमेंट्री डायरेक्टर आहेत.
झलक सध्या २५ वर्षांची झाली आहे. तिच्यामध्ये फारच फरक झालेला दिसून येतो. अनेकांना तिला ओळखणं देखील कठीण जातं.
झलक सध्या अभिनयापासून दूर आहे. ती आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे. ती सध्या एमबीए करत आहे. तसेच तिला इतिहासाची प्रचंड आवड आहे. त्यामुळे तिला या विषयात पदवी घ्यायची आहे.
झलक शुक्लाने करिश्मा का करिश्मा या प्रसिद्ध टीव्ही मालिकेमध्ये काम केलं आहे. तसेच ती सोनपरी मध्ये दिसली आहे. तसेच तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.