अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे. तर दुसरीकडे इम्रान हाश्मीसुद्धा बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. या दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे की हे दोन्ही कलाकरांमध्ये कौटुंबिक संबंध आहेत. हे दोघेही एकाच कुटुंबातील आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
अभिनेत्री आलिया भट्ट आणि इम्रान हाश्मी यांच्यामध्ये बहीण-भावाचं नातं आहे. वाटलं ना आश्चर्य? मात्र हे खरं आहे. इम्रान हाश्मीचे वडील अन्वर हाश्मी हे होते. अन्वर हाश्मीची आई पूर्णिमा दास या होत्या. आणि त्या शिरीन मोहम्मद अली यांच्या बहीणसुद्धा होत्या. शिरीन या मुकेश भट्ट आणि महेश भट्ट यांच्या आई होत्या.
त्यामुळे इम्रान हाश्मी हा नात्याने महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांचा भाचा आहे. म्हणजेच अभिनेत्री आलिया भट्ट आणि पूजा भट्टचा कझिन आहे. मात्र या नात्याबद्दल अनेक लोकांना माहिती नाही. इतकंच नव्हे तर इम्रान हाश्मी 'विलन'फेम डायरेक्टर मोहित सूरी याचासुद्धा कझिन आहे.
इम्रान हाश्मीला बॉलिवूडमधील एक बोल्ड अभिनेता म्हणून ओळखलं जातं. त्याने आपल्या अनेक चित्रपटात बोल्ड सीन दिले आहेत. तसेच या अभिनेत्याला 'मर्डर' या चित्रपटातून ओळख मिळाली होती. अभिनेत्री मल्लिका शेरावतसोबत दिलेल्या बोल्ड सीनमुळे हा अभिनेता चर्चेत आला होता.
इम्रान हाश्मीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या तो अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफसोबत 'टायगर ३' चित्रपटता काम करत आहे. सलमान आणि इम्रानमध्ये सेटवर घट्ट मैत्री झाल्याचंही नुकताच समोर आलं होतं. हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.