माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून ज्यात यश परी ही नेहाचीच मुलगी असल्याचं आजोबांना सांगतो. मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, नेहा कंपनीचं काम आटोपून भारतात येते. चौधरींच्या घरात नेहाचं स्वागत करण्यात येतं. नेहा आल्याने आजोबा देखील खुश असून घरी आलेली परी अनाथ समजून आजोबा तिला दत्तक घेण्याचा निर्णय सर्वांना सांगतात. हा निर्णय ऐकून नेहाला जबरदस्त धक्का बसतो आणि खाली कोसळते. नेहाला अशा परिस्थित पाहून आजोबा हा सगळा काय प्रकार असल्याचं विचारता. त्यावर यश त्यांना परी अनाथ नसून तिचे आई वडिल जिवंत असून नेहा परीची खरी आई असल्याचं सांगतात. परीच्या आईचं सत्य ऐकून आजोबांना देखील धक्का बसतो. परीच्या आईचं सत्य समोर आल्याने मालिका आता नव्या वळणार येऊन ठेपली आहे. नेहा आणि यश यांच्या प्रेमकहाणीत खडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालिकेचे आगामी भाग पाहणे अत्यंत महात्त्वाचे ठरणार आहेत. आजोबांना परीचं सत्य कळल्यानंतर त्यांनी नेहाला दिलेले हक्क ते तिच्यापासून काढून घेणार का? यश आणि नेहा यांच्या लग्नाला आजोबा नकार देणार का? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत. तर दुसरीकडे यशने आपल्यापासून इतक्या गोष्टी लपवून ठेवल्याने नेहाला देखील धक्का बसला आहे. ज्या माणसावर आपण विश्वास ठेवून परीला त्यांच्या घरी ठेवलं त्या घरात ती अनाथ म्हणून राहत असल्याचं कळल्यानंतर नेहाला मोठा धक्का बसला आहे. यश आपल्याशी खोटं बोलल्याने नेहा दुखावली आहे. त्यामुळे यशबरोबर लग्न करण्यासाठी नेहा तयार होणार का ? असा प्रश्न देखील समोर आला आहे. त्यामुळे मालिकेच्या येत्या भागात काय घडणार हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.