जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या बायकोचा हॉट अंदाज, Beach Vibes देणारा डान्सचा VIDEO व्हायरल

युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या बायकोचा हॉट अंदाज, Beach Vibes देणारा डान्सचा VIDEO व्हायरल

युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या बायकोचा हॉट अंदाज, Beach Vibes देणारा डान्सचा VIDEO व्हायरल

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)ची होणारी बायको धनश्री (Dhanashree Verma) त्याला आणि आरसीबीला सपोर्ट करण्यासाठी युएईला पोहोचली आहे. याठिकाणी धमाल करतानाचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : कोरोना व्हायरस पँडेमिकमुळे (Coronavirus Pandemic) यावर्षी आयपीएल युएईमध्ये (UAE) होत आहे. या टूर्नामेंटमधील निम्मे सामने झाले आहेत. आयपीएल पॉइंट टेबल देखील रोमांचक होत आहे. या आयपीएल मधील अधिकतर खेळाडू त्यांच्या कुटुंबासमवेत याठिकाणी आले आहेत. यावर्षी कोरोनामुळे सर्व खेळाडूंचं कुटुंब त्यांच्यासोबत नाही आहे, पण कागी क्रिकेटर्सच्या पत्नी त्यांना सपोर्ट करण्यासाठी युएईमध्ये पोहोचल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal Challengers Bangalore) स्पीनर युजवेंद्र चहल याची होणारी बायको देखील युएईमध्ये आहे. आयपील 2020 सुरू झालं त्यावेळी युझी एकटाच युएईमध्ये आला होता. मात्र त्याची होणारी बायको धनश्री (Dhanashree Verma)ने इथे पोहचून त्याला सरप्राइज दिलं आहे. धनश्री त्याला आणि आरसीबीला सपोर्ट करण्यासाठी युएईला पोहोचली आहे. याठिकाणी धमाल करतानाचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धनश्री एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. याआधी देखील तिचे डान्सचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान सध्या तिचा एक युएईमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. (हे वाचा- ओळखताही येणार नाही अशी झाली बादशाहच्या चेहऱ्याची अवस्था, हा PHOTO होतोय व्हायरल) सोशल मीडियावर सक्रीय असणारी धनश्री तिच्या Dance Moves चे विविध व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. धनश्रीने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती युएईमधील एका समुद्र किनाऱ्यावर डान्स करताना दिसत आहे. ती टोनी कक्करच्या ‘लैला’ या गाण्यावर डान्स करते आहे. सोशल मीडिया युजर्स या व्हिडीओचं कौतुक कमेंट्सच्या माध्यमातून करत आहेत.

जाहिरात

याआधी धनश्रीने सोशल मीडियावर ट्रेड होत असलेले ‘बुर्ज खलिफा’ चॅलेंज देखील स्विकारले होते. अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बाँब’ सिनेमातील Burj Khalifa गाण्यावर डान्स करून व्हिडीओ पोस्ट करण्याचे हे चॅलेंज आहे. या व्हिडीओमध्ये देखील धनश्रीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

IPL 2020 सीझनमध्ये आरसीबीचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे. सुरुवातीच्या काही सामन्यात खराब प्रदर्शन केलेल्या आरसीबीने आता जबरदस्त सुधारणा केली आहे. आरसीबी सध्या पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात