मुंबई, 24 ऑक्टोबर : बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर बादशाह (Rapper Badshah)च्या एका फोटोमुळे त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. बादशाहने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्याचा चेहऱ्या भाजल्यासारखा दिसत आहे. हा ‘Sunburned’ फोटो आहे, पण एखाद्याला हा फोटो पाहून त्याच्या चेहऱ्याला काहीतरी गंभीर झाले आहे का असे वाटेल. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्याची त्वचा सोललेली दिसते आहे. बादशाहच्या या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, त्याचा नाक, गाल, संपूर्ण चेहऱ्यावरती त्वचा सोलली गेली आहे. त्याचप्रमाणे चेहरा लाल देखील झाला आहे. त्याची ही अवस्था मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय केल्यानंतर झाली आहे.
बादशाहच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. गायक अरमान मलिकने ‘बॅड बर्न’ म्हटले आहे तर अभिनेता मनिष पॉलने बादशाहच्या या परिस्थितीची गंमत केली आहे. मनिषने असं म्हटलं की, ‘भाई, टोस्टरमध्ये ब्रेडच्या ऐवजी तू स्वत: पडलास का?’ बादशाहच्या या पोस्टवर अनेक स्टार्सनी कमेंट केली आहे. वरूण धवन देखील सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवमध्ये गेला होता. त्याची देखील अशीच अवस्था झाली होती. बादशाहच्या या पोस्टवर वरूणने देखील कमेंट केली आहे. ‘माझ्यासोबतही असंच झालं होतं’, अशी कमेंट वरूणने केली आहे. (हे वाचा- एकाच सिनेमात 17 किसींग सीन देत चर्चेत आलेली बॉलिवूड अभिनेत्री आता झाली गायब ) वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या बादशाहचं ‘टॉक्सिक’ हे गाणं सध्या सर्वत्र प्रसिद्ध होत आहे. नुकतंच हे गाणं प्रसिद्ध झालं आहे. यामध्ये रवि दुबे आणि सरगुन मेहना हे सेलिब्रिटी कपल आहे. युट्यूबवर देखील ट्रेंडिगमध्ये हे गाणं दिसत आहे. तर काही दिवसांपूर्वी बादशाहचे शाहरुखच्या केकेआर (KKR) साठी एक गाणं प्रदर्शित झालं होतं. यामध्ये शाहरुखचा नवा लुक पाहायला मिळत आहे.