मुंबई, 02 जानेवारी : आजकाल प्रत्येक मालिकेत एक ना दोन बालकलाकार काम करत आहेत. मराठी प्रमाणेच हिंदी मालिकांमधील बालकलाकारांना सुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळते. मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता या बालकलाकरांना नाव, पैसा फेम या तिनही गोष्टी मिळत आहेत. मालिकेमुळं प्रचंड लोकप्रिय झालेली अशीच एक बालकलाकार म्हणजे रुहानिका धवन. रुहानिकानं ‘ये है मोहब्बते’ या हिंदी मालिकेमध्ये रुहीची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर हि रुही घराघरात प्रसिद्ध झाली होती. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आलीये. त्याच कारण म्हणजे तिनं वयाच्या पंधराव्या वर्षीच कोट्यवधींचं घर खरेदी केलं आहे. रुहानिकानं ‘ये है मोहब्बते’ या हिंदी मालिकेमध्ये रुहीची भूमिका साकारली होती. रुहानिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घर खरेदी केल्याचं चाहत्यांसोबत शेअर केलंय. तसंच एक खास सीक्रेटही सांगितलं. की, केवळ १५ व्या वर्षी तिनं घर कसं काय खरेदी केलं. रुहानिका धवनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नवीन घर घेतल्याची घोषणा करत हे घराची एक झलक दाखवली आहे. या पोस्टमध्ये तिने आपला आनंद शेअर करताना घर घेण्याचे स्वप्न कसे पूर्ण झाले हे देखील सांगितले आहे. रुहानिकाने चाहत्यांना असेही सांगितले की, जर ती तिची स्वप्ने पूर्ण करू शकते तर इतरही करू शकतात. हेही वाचा - Sheezan Khan : शिझानच्या बहिणींनी तुनिषाच्या आईबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाल्या ‘त्या जबरदस्तीने… रुहानिका धवनने लिहिले आहे की, ‘वाहेगुरुजी आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद, मी माझा आनंद तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. एक नवीन सुरुवात. माझे हृदय आनंद आणि प्रेमाने भरले आहे आणि मी अत्यंत आभारी आहे. माझे एक स्वप्न मी पूर्ण केले आहे. मी स्वतःचे घर घेतले आहे. हे माझ्यासाठी खूप मोठे यश आहे. म्हणूनच मला ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचे होते. मला मिळालेल्या सर्व प्लॅटफॉर्म आणि संधींसाठी मी आणि माझे पालक आभारी आहोत आणि त्यांच्यामुळेच मी माझे स्वप्न पूर्ण करू शकले.’’
रुहानिका हे घर घेणं केवळ आईमुळंच शक्य झाल्याचं म्हटलंय. तिच्या आईनं मिळालेलं मानधन खर्च न करता बचत करून ठेवलं होतं. ही तर केवळ सुरुवात आहे. आणखी मोठी स्वप्न पूर्ण व्हायची आहेत, असं तिनं म्हटलं होतं.
या यशाबद्दल सर्वजण रुहानिका धवनचे अभिनंदन करत आहेत. चाहत्यांसोबतच सेलेब्स देखील रुहानिका धवनला या कामगिरीसाठी शुभेच्छा देत आहेत. करिअरबद्दल बोलायचे झाले तर रुहानिका धवनने 2012 मध्ये ‘मिसेस कौशिक की पांच बहुएं’ या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण ती रुही रमन भल्ला बनून लोकप्रिय झाली. या शोसाठी त्याला सर्वाधिक लोकप्रिय बाल कलाकाराचा ITA पुरस्कारही मिळाला. रुहानिका धवननेही चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2014 मध्ये रुहानिकाने सलमान खानच्या ‘जय हो’ आणि सनी देओल स्टारर ‘घायल वन्स अगेन’ या चित्रपटातही काम केले होते.