SRK च्या FAN ची गजब कहाणी; फिल्ममध्ये Jabra fan गाणं दिसलं नाही म्हणून उचचलं होतं असं पाऊल

SRK च्या FAN ची गजब कहाणी; फिल्ममध्ये Jabra fan गाणं दिसलं नाही म्हणून उचचलं होतं असं पाऊल

फॅन (FAN) फिल्मधील चाहत्याप्रमाणेच शाहरूख खानच्या (Shahrukh Khan fan) रिअल लाइफ चाहत्यानेसुद्धा मोठी अडचण निर्माण केली होती.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : पाच वर्षांपूर्वी अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan)  ‘फॅन’ (Fan) हा चित्रपट आला होता. पण चित्रपटापेक्षा त्याच्या ‘जबरा फॅन’ (Jabra fan) गाण्याची फार चर्चा झाली होती. हे गाणं हिटदेखील ठरलं होतं. पण याच गाण्यामुळे ही फिल्म अडचणीतही सापडली होती. शाहरूखच्या रिअल लाइफ चाहत्यानेच (Shahrukh Khan fan) मोठं पाऊल उचललं होतं.

शाहरूखच्या फॅन फिल्मच्या प्रमोशनसाठी या गाण्याचा भरपूर वापर करण्यात आला होता. पण प्रत्यक्ष चित्रपटगृहात जेव्हा प्रेक्षक चित्रपट पाहायला गेले तेव्हा हे गाणं कुठेच दिसलं नाही आणि त्यामुळे शाहरुखचे फॅन फारच संतापले होते. प्रेक्षकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला गेलाय असा आरोप प्रेक्षकांनी केला.

यशराज फिल्म्स (YRF) ने चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यामुळे प्रेक्षकांनी सगळा राग हा यशराज प्रोडक्शनवर काढला. त्यामुळे यशराज फिल्म्ससाठी हा फार मोठा धक्का होता. फॅन्सचा इतका रोष त्यांनी ओढवून घेतला होता.

हे वाचा - So expensive! ज्या ड्रेसवरून प्रियांका चोप्रा झाली ट्रोल; त्याची किंमत वाचूनच येईल चक्कर

औरंगाबादची राहणारी शाहरुखची फॅन आफरीन फातिमा झैदने याविरुद्ध महाराष्ट्र राज्य उपभोक्ता आयोग (Maharashtra State Consumer Commission) यांच्याकडे तक्रार दाखल केली. महाराष्ट्र राज्य उपभोक्ता आयोग (Maharashtra State Consumer Commission) ने तक्रारीला गांभीर्याने घेत 2017 साली यशराज फिल्मला (YRF) याबाबत एक पत्र पाठवलं.

हे वाचा - खाली डोकं, वर पाय! हटके योगा करणाऱ्या या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत काय?

यशराज फिल्म्स स्टुडिओजला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर या केसच्या संपूर्ण खर्चासाठी 5 हजार रुपये अधिक दंड भरण्यास सांगितला. यशराज फिल्म्सला 15000 रुपयांची भरपाई द्यावी लागली होती. त्यामुळे हे गाणं शाहरुख आणि यशराज फिल्म्ससाठी डोकेदुखी ठरलं होतं.

Published by: News Digital
First published: April 15, 2021, 10:56 PM IST

ताज्या बातम्या