खाली डोकं, वर पाय! हटके योगा करणाऱ्या या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत काय?

खाली डोकं, वर पाय! हटके योगा करणाऱ्या या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत काय?

या अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तुम्ही सांगू शकाल का ही कोण आहे?

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल: बहुतेक सेलिब्रिटी (Celebrity yoga) आपले व्यायामाचे, योगाचे व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. चाहत्यांना फिटनेसचेही (Celebrity fitness) धडे देत असतात. योगा असो किंवा व्यायाम त्यात काही तरी वेगळं, हटके आणि कठीण असं आसन करून चाहते असो किंवा इतर सोशल मीडिया युझर्स त्यांचं लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असतो. अशाच एका अभिनेत्रीने हटके पद्धतीने योगा केला आहे. जिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता ही अभिनेत्री कोण हे तुम्ही फोटोवरून ओळखलंत का? ओळखलंत तर उत्तम. नाहीतर आम्ही सांगतो.

अशा वेगळ्या पद्धतीने योगा करणारी ही अभिनेत्री म्हणजे समंथा अक्कीनेनी (Samantha ruth prabhu Akkineni). दक्षिणेतील ही अभिनेत्री अभिनयासोबतच तिच्या फिटनेसाठीही प्रसिद्ध आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर नेहमीच फिटनेस व्हिडीओस (Fitness videos) शेअर करून चाहत्यांना प्रेरित करत असते. ती योग साधनेत पारंगत असल्याचं तिच्या व्हिडीओ आणि फोटोजवरून लक्षात येतं.

नुकताच तिने एक योग करतानाचा आपला फोटो सेशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात ती कठिन अशी योगा पोझ देत आहे. एका दोरीवर ती उलटी लटकली आहे.

हे वाचा - सोनू सूदचा निर्धार; गरीब रुग्णांसाठी बांधतोय नवं हॉस्पिटल

काही दिवसांपूर्वीच तिने असाच एक व्हिडीओ पोस्ट केला होता, त्यात ती कठीण योगासन करत आहे. त्यामुळे ते पाहून तिचे चाहते अवाक झाले होते.

समंथा तिचा व्यायाम चुकवत नाही. ती नियमित एक्सरसाइज करते. तसेच तिने काही दिवसांपूर्वीच  प्लांट बेस डायट सुरू केला आहे. हा आहार मांसपेशींना मजबूत करण्यासाठी मदत करतो अस तिचं म्हणणं आहे.

समंथा सोशल मीडिया फारच सक्रिय असते तिच्या व्यायामाचे तसेच विविध गोष्टींबद्दलच्या पोस्ट ती सतत शेअर करत असते. शिवाय तिला बगिच्यांमध्ये झाडे लावायला आवडतात.  त्यानंतर योगा हा तिचा आवडता विषय असल्याचं तिने म्हटलं होतं.

हे वाचा - प्रियांका चोप्राला होतं दारुचं व्यसन; कॉकटेल पिऊन विमानात झाली होती टल्ली

समंथा ही प्रसिद्ध दाक्षिणी अभिनेता नागार्जुन (Akkineni Nagarjuna) याची सून असून नागा चैतन्य (Akkineni Naga Chaitanya) याची पत्नी आहे. ती लवकरच एका नव्या तेलुगू आणि तमिळ चित्रपटात दिसणार आहे.

Published by: News Digital
First published: April 15, 2021, 6:09 PM IST

ताज्या बातम्या