या प्रसिद्ध महिला खासदार दिसणार SOS Kolkata मध्ये, सिनेमाच्या टीजरला नेटकऱ्यांची पसंती

या प्रसिद्ध महिला खासदार दिसणार SOS Kolkata मध्ये, सिनेमाच्या टीजरला नेटकऱ्यांची पसंती

मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty), नुसरत जहाँ (Nusrat Jahan), इना साहा आणि यश स्टारर एसओएस कोलकाता (Sos Kolkata) 17 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आतापासूनच बंगाली प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबत क्रेझ पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर : बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि TMC खासदार असणाऱ्या नुसरत जहाँ (Nusrat Jahan) आणि मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ही मैत्रिणींची जोडी एसओएस कोलकाता (SOS Kolkata) या सिनेमात एकत्र दिसणार आहे. दरम्यान या सिनेमाचा टीजर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते सिनेमाबाबत उत्सुक आहेत. हा टीजर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटात मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ यांच्या व्यतिरिक्त बंगाली सुपरस्टार यश देखील पाहायला मिळणार आहे. SOS Kolkata च्या टीझरमध्ये नुसरत जहाँ या पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहेत, तर मिमी चक्रवर्ती यांचा अंदाज देखील प्रेक्षकांना आवडत आहे.

मिमी चक्रवर्ती , नुसरत जहाँ , इना साहा आणि यश स्टारर एसओएस कोलकाता 17 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आतापासूनच बंगाली प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबत क्रेझ पाहायला मिळत आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती.

(हे वाचा-उर्वशी रौतेलाने फक्त शर्ट घालून केलं हॉट फोटोशूट, सोशल मीडियावर झाली ट्रोल)

टीएमसी खासदार असणाऱ्या नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांनी या सिनेमाचा टीजर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. नुसरत यांनी सिनेमाची घोषणा केल्यानंतर मात्र हा सिनेमा काहीसा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

सोशल मीडियावर हा सिनेमा बॅन करण्यात यावा अशी मागणी वाढत आहे. नुसरत जहाँ यांच्या एका वक्तव्यानंतर मोठा गोंधळ झाल्यानंतर सिनेमा बॅन केला जावा अशी मागणी वाढली.

(हे वाचा-'हॅश है क्या?' ड्रग्जबाबत विचारणाऱ्या ट्रोलरलाच अभिषेक बच्चनने केलं ट्रोल)

त्याचप्रमाणे नुकतेच नुसरत जहाँ यांनी केलेले फोटोशूट देखील चर्चेचा विषय ठरलं आहे. ज्यामध्ये त्यांनी दुर्गा देवीच्या अवतारात फोटोशूट केले आहे. मात्र याला धार्मिक रंग देत अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. याचा परिणाम सिनेमाच्या कमाईवर होण्याची शक्यता आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 2, 2020, 10:54 AM IST

ताज्या बातम्या