बॉलिवूडमधील बोल्ड अँड ब्यूटिफूल अभिनेत्रींपैकी उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) एक आहे. ती नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. चाहत्यांसाठी ती काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान तिने सोशल मीडियावर नुकतेच शेअर केलेल्या फोटोशूटवर चाहते घायाळ झाले आहेत. (फोटो सौजन्य-@urvashirautela/Instagram)
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास उर्वशीने ‘साहब द ग्रेट’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यामध्ये तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती बॉलिवूड रॅपर हनी सिंगबरोबर लव्हडोस अल्बममध्ये दिसली होती, हे गाणं खूप प्रसिद्ध झाले होते. यानंतर चाहत्यांना उर्वशीला मस्तीचा सिक्वेल ग्रेट ग्रँडमस्ती मध्ये पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी उर्वशी व्हर्जिन भानूप्रियामध्ये दिसली होती. (फोटो सौजन्य-@urvashirautela/Instagram)