मुंबई, 01 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ड्रग केस (Drug Case in Bollywood) मुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. मोठ्या अभिनेत्रींची नावं या संपूर्ण प्रकारात समोर आली आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) ड्रग अँगल समोर आल्याने एनसीबी (NCB) यामध्ये चौकशी करत आहे. या तपासात येणारी माहिती धक्कादायक आहे. अनेक मोठी नावं या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे.
दरम्यान बॉलिवूड इंडस्ट्रीवर ड्रग केसचा मोठा परिणाम होत आहे. प्रत्येक दिवशी बॉलिवूडमधील कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. मग त्या कलाकाराचे नाव या केसमध्ये समोर आलेले असूदे किंवा नसूदे. या सर्वच कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मात्र ट्रोलर्सना चोख शब्दात उत्तर देण्याची खासियत असणाऱ्या अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने यावेळी देखील एका ट्रोलरची बोलती बंद केली आहे.
(हे वाचा-ड्रग्ज प्रकरणात शाहरुख, रणबीर आणि अर्जुनही अडकणार? NCB च्या रडारवर बॉलिवूड)
एका युजरने अभिषेकला विचारले की, 'हॅश है क्या?' त्यावर खूप हजरजबाबी उत्तर अभिषेकने दिले आहे. अभिषेकने असे म्हटले आहे की, 'नाही, माफ करा. पण हे असं करू नका. पण मला तुम्हाला मदत करताना आणि तुमची ओळख मुंबई पोलिसांशी करून देताना आनंद होईल. नक्कीच ते देखील तुमच्या गरजा जाणून घेण्यात आनंदी असतील आणि तुम्हाला मदत करतील.'
That, alas, is in your (the audiences) hand. If you don’t like our work, we won’t get our next job. So we work to the best of our abilities and hope and pray for the best. 🙏🏽
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) September 30, 2020
(हे वाचा-अनुराग कश्यपची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू, पायल घोषचा लैंगिक छळाचा आरोप)
याआधी देखील अभिषेकला जॉबलेस असल्याचे म्हणत एका युजरने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी देखील अभिषेकच्या हजरजबाबी उत्तरामुळे अनेकांची मनं जिंकली होती. अभिषेक तेव्हा असे म्हणाला होता की, 'हे तुमच्या हातात आहे. जर तुम्हाला आमचे काम आवडले नाही तर आम्हाला पुढचा जॉब मिळणार नाही. त्यामुळे आम्ही पूर्ण मेहनतीने काम करतो आणि चांगल्या रिझल्टसाठी प्रार्थना करतो.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Abhishek Bachchan, Bollywood