मुंबई, 5 मार्च- फक्त देशातीलच नव्हे तर जगभरातील लोक ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाची रिलीज डेट आता जवळ आलेली आहे. या चित्रपटाची अधिक प्रतीक्षा केली जात आहे कारण यात बाहुबली फेम प्रभासची (Prabhas) भूमिका आहे जो पहिल्यांदाच पडद्यावर पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट जोरदार प्रमोशन करत असून यादरम्यान प्रभासच्या लग्नाच्या चर्चाही खूप ऐकायला मिळत आहेत. त्यागी ज्योतिषी आचार्य विनोद कुमार (Acharya Vinod Kumar) यांनी अलीकडेच प्रभासच्या लग्नाच्या अंदाजाबाबत एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढणार आहे. ‘राधे श्याम’ या चित्रपटामध्ये प्रभास विक्रमादित्य या हस्तरेखावादकाची भूमिका साकारताना दिसणार असल्याने, प्रमोशनसाठी निर्मात्यांनी देशभरातील सिनेमागृहांच्या बाहेर ज्योतिषी बसवले आहेत. जे अनेकांचे हात पाहतात आणि त्यांना भविष्य सांगतात. दरम्यान, ज्योतिषी आचार्य विनोद कुमार यांनी चित्रपटाच्या मुख्य कलाकाराचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी बाहुबलीशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, 2022 हे वर्ष अभिनेत्यासाठी खूप छान असणार आहे आणि त्याला अनेक नवीन मित्र भेटणार आहेत. तसेच, त्यांना यावर्षी एक जाणीव होणार आहे. आणि त्यांना प्रचंड यशही मिळणार आहे’.
प्रभासचे लग्न कधी होणार? असे व्हिडीओमध्ये अनेकांनी विचारले असता, अभिनेत्याची कुंडली पाहता, 23 ऑक्टोबर 2022 पासून त्याच्या लग्नाचे योग जुळून येत असल्याचे भाकित त्यांनी केले आहे. प्रभास ऑक्टोबर 2023 पूर्वी कोणाशी तरी लग्न करू शकतो, असेही त्यांनी म्हटलं आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ज्योतिषी लिहितात @actorprabhas “लवकरच” लग्न करणार आहे! संपूर्ण भारतातील सर्वात देखण्या स्टारसाठी माझा अंदाज आहे. जो लवकरच #राधेश्याममध्ये हस्तरेखावादकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.