मुंबई, 16 फेब्रुवारी : अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या त्याच्या ‘द नाइट मॅनेजर’ या वेब सीरिजमुळे चर्चे आहे. नुकताच सीरिजचा प्रीमियर देखील पार पडला. सीरिजमध्ये आदित्यबरोबरच अभिनेत्री विद्या बालन, अनन्या पांडे सह अनेक स्टार कलाकार आहेत. दरम्यान आदित्य रॉय कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आदित्य ‘द नाईट मॅनेजर’च्या प्रीमियरनंतर घरी जात होता. तेव्हा त्यांच्याबरोबर एक वेगळाच प्रकार घडला. आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्यासाठी सगळेच फॅन्स आतूर असतात. अशीच एक फॅन आदित्यला भेटली. आदित्यला पाहाताच ती प्रचंड खूश झाली. आदित्य देखील फॅन्सची गर्दी पाहून खुश झाला. पण पुढे जे काही घडलं त्यानंतर सगळ्यांचाच भुवया उंचावल्या आहेत. प्रीमियर आटोपल्यानंतर आदित्य त्याच्या गाडीत बसून घरी जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान तिथे काही लेडिज फॅन्स आल्या. प्रत्येकीच्या हातात सेल्फी घेण्यासाठी फोन होते. सगळ्याच आदित्यला पाहून घायाळ झाल्या होत्या. त्यातील एक महिला फॅन त्याच्या जवळ आली. आदित्यची सिक्युरिटी असूनही तिनं आदित्यबरोबर हात मिळवला. त्याचं कौतुक केलं. तिनं आदित्यबरोबर सेल्फी देखील काढला. सेल्फी काढून झाल्यानंतर ती आदित्यच्या आणखी जवळ जाऊ लागली. आदित्यच्या खांद्याला लागत असलेल्या त्या फॅननं अक्षर:आदित्यला मिठी मारून त्याला किस करण्याचा प्रयत्न केला. आदित्य नाही नाही म्हणत असतानाही तिनं ‘एक किस’ ‘एक किस’ म्हणत दोन वेळा आदित्यला किस करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. हेही वाचा - Shiv Thakare Exclusive : अमरावतीचा शिव सांगतोय शिक्षणाचं महत्त्वाचं; पण तो कितवी शिकलाय माहितीये का?
आदित्यबरोबर झालेल्या या प्रकारानंतर अदित्य देखील शॉक झाला होता. फॅन्सचं प्रेम त्याला आवडलं पण पुढे जे घडलं त्यानं तो देखील लाजरा बुजरा झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आदित्यबरोबर झालेला प्रकार पाहून आदित्यच्या अनेक फॅन्सनी नाराजी व्यक्त केली आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत आहे की, आदित्यबरोबर सेल्फी घेण्यासाठी अनेक महिला पुढे येत आहेत. आदित्यनं प्रत्येकीबरोबर सेल्फी घेतला. पण त्यातील एक फॅन जेव्हा आदित्यच्या मानेला धरून त्याला किस करण्याचा प्रयत्न करतेय. त्यातील एक महिला त्याला म्हणतेय मी तुला भेटण्यासाठी दुबईहून आले आहेत.
या व्हिडीओ कमेंट्स करत नेटकऱ्यांनी म्हटलंय, ‘ही हरासमेंट आहे’. तर काहींनी म्हटलंय, ‘हे जर कोणत्या महिला कलाकाराबरोबर झालं असतं तर वादळ उठलं असतं’. आणखी एका युझरनं लिहिलंय, ‘लोकांना काय झालंय. मलाही आदित्य आवडतो पण त्याला जबरदस्ती किस नाही करणार’.