Home /News /entertainment /

10 वर्ष ऑस्करमध्ये जाण्यावर बंदी; स्टेजवर कानशिलात लगावल्याने Will Smith विरोधात अकादमीची कारवाई

10 वर्ष ऑस्करमध्ये जाण्यावर बंदी; स्टेजवर कानशिलात लगावल्याने Will Smith विरोधात अकादमीची कारवाई

विल स्मिथ आता पुढील 10 वर्षे कोणत्याही ऑस्कर सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाही. ऑस्कर अवॉर्ड शो दरम्यान, विल स्मिथने त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेडा पिंकेट स्मिथ विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल होस्ट क्रिस रॉकला कानशिलात मारली होती

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 09 एप्रिल : अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने हॉलिवूड अभिनेता विल स्मिथवर (Will Smith) 'थप्पड' प्रकरणी कठोर कारवाई करत त्याला 10 वर्षांसाठी ऑस्कर सोहळ्याला उपस्थित राहण्यास बंदी घातली आहे (Will Smith gets 10 year Oscars ban). विल स्मिथने ऑस्कर अवॉर्ड शोमध्ये (Oscar award show) प्रसिद्ध अमेरिकन कॉमेडियन आणि होस्ट क्रिस रॉकला कानशिलात लगावली होती. यावरुन सुरू झालेल्या वादानंतर अकादमीने ही कारवाई केली आहे. विल स्मिथ आता पुढील 10 वर्षे कोणत्याही ऑस्कर सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाही. ऑस्कर अवॉर्ड शो दरम्यान, विल स्मिथने त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेडा पिंकेट स्मिथ विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल होस्ट क्रिस रॉकला कानशिलात मारली होती. मात्र, या घटनेनंतर त्याने माफीही मागितली होती आणि अकादमीने केलेली कारवाई मान्य करत असल्याचं सांगितलं होतं. Shocking! प्रसिद्ध डिझायनरने यामी गौतमला वेडिंग लेहेंगा देण्यास दिला होता नकार? ऐनवेळी नेसावी लागली आईची साडी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन हडसन यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की "94 व्या ऑस्करचा उद्देश गेल्या वर्षी अविश्वसनीय काम केलेल्या अनेक लोकांचा उत्सव साजरा करणं हा होता. मात्र यादरम्यान विल स्मिथच्या अस्वीकार्य वागण्याने हे सगळं विस्कळीत झालं. कानशिलात मारल्यानंतर 'किंग रिचर्ड' चित्रपटातील अभिनयासाठी विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, पण या घटनेने पुरस्कार सोहळ्याची संपूर्ण मजाच नाहीशी झाली. RRR: पत्रकाराने Jr. NTR ला विचारला असा कठीण प्रश्न, राम चरणला द्यावं लागलं उत्तर काय आहे प्रकरण - क्रिस रॉकने 94 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली होती. क्रिस रॉकने फिल्म G.I. Jane सिनेमाबद्दल विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ (Jada Pinkett Smith) ची खिल्ली उडवली. क्रिस रॉकने जेडाच्या टकलेपणाबाबत टिप्पणी केली होती. विल स्मिथची पत्नी जेडाही Alopecia नावाच्या केसगळतीच्या व्याधीमुळे त्रस्त आहे.. विल स्मिथला हा विनोद अजिबात आवडला नाही आणि त्याने स्टेजवर जाऊन क्रिस रॉकला कानशिलात मारली. विल स्मिथने अलीकडेच अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि यासह त्याने पुन्हा एकदा या घटनेबद्दल क्रिस रॉक आणि सर्वांची माफी मागितली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Hollywood, Oscar award show

    पुढील बातम्या