बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम गेल्या काही दिवसांपासून आपल्या 'दसवी' या चित्रपटामुळे सतत चर्चेत होती. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यामी गौतमने तिच्या लग्नाच्या पोशाखाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीदरम्यान यामीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने सांगितले आणि तिने लग्नात तिच्या आईची साडी का नेसली होती याबद्दल लोकांना सांगितलं.
यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले आहे. या जोडप्याने 4 जून 2021 रोजी हिमाचल प्रदेशमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने आणि गुपचूप लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. यामी आणि आदित्यच्या लग्नाने केवळ चाहतेच नव्हे तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही धक्का बसला होता.
यामी गौतमचा पती आदित्य धर 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान यामी-आदित्यची लव्हस्टोरी सुरु झाली होती. त्यांनतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
यामी गौतमचा लग्नसोहळा अतिशय पारंपारिक आणि साध्या पद्धतीने पार पडला होता. इतकंच नव्हे तर या अभिनेत्रीने आईची साडी नेसून लग्न केलं आहे. अभिनेत्रीच्या या निर्णयामुळे तिचे चाहते खूप खूश झाले. आता यामीने लग्नानंतर एक महत्वाचा खुलासा केला आहे.
यामी गौतमने या मुलाखतीमध्ये जे सांगितलंय ते खरोखरच धक्कादायक आहे. मुलाखतीदरम्यान, यामीने यावेळी मान्य केलं की तिच्याकडे अनेक चांगले डिझाइनर आहेत. तथापि, फॅशन इंडस्ट्रीतील काही स्वार्थी लोकांच्या वागण्याने ती अजूनही दु:खी आहे.
तिने उघड केले की फॅशन इंडस्ट्रीमध्येही, काही मोठे डिझायनर असे आहेत जे तुम्हाला त्यांचे पोशाख देत नाहीत कारण त्यांच्या नजरेत तुम्ही तसे नसता जसे त्यांना हवं असतं.
तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल बोलताना यामी गौतम म्हणाली, "मला आठवते की मी एकदा माझ्याबद्दल ऐकले होते. एक व्यक्ती म्हणाली, 'नाही, तो लेहेंगा तुमच्यासाठी नाही' कारण त्यांच्या म्हणण्यानुसार, मी त्या डिझायनरचा ड्रेस परिधान केला होता. जिच्यासोबत ते काम करत नाही.
ती म्हणते की तो खूप स्वार्थी होता. मला कळत नाही ही काय पद्धत आहे. तुम्ही एखाद्याला इतके वाईट कसे वाटू शकता? परंतु हे सर्व डिझाइनरसाठी खरे नाही, त्यापैकी काही त्यांच्या कामाने आणि त्यांच्या वागणुकीने खरोखर चांगले आहेत, परंतु एक नासकं फळ सर्वांजवळ असतं'.