Home /News /entertainment /

RRR: पत्रकाराने Jr. NTR ला विचारला असा कठीण प्रश्न, राम चरणला द्यावं लागलं उत्तर

RRR: पत्रकाराने Jr. NTR ला विचारला असा कठीण प्रश्न, राम चरणला द्यावं लागलं उत्तर

'बाहुबली' (Bahubali) फेम साऊथ दिग्दर्शक (South Director) SS राजामौली (SS Rajamouli) यांचा RRR हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केल्यानंतर चित्रपटाच्या टीमने नुकतीच मुंबईत जंगी पार्टी आयोजित केली होती.

पुढे वाचा ...
  मुंबई, 8 एप्रिल- 'बाहुबली'   (Bahubali)  फेम साऊथ दिग्दर्शक   (South Director)  SS राजामौली (SS Rajamouli)  यांचा RRR हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केल्यानंतर चित्रपटाच्या टीमने नुकतीच मुंबईत जंगी पार्टी आयोजित केली होती. यामध्ये चित्रपटाच्या मुख्य कलाकरांसोबत अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. या व्यतिरिक्त, सर्व पत्रकारदेखील कार्यक्रम कव्हर करण्यासाठी आले होते आणि त्यानंतर एका पत्रकाराने ज्युनियर एनटीआरला एक असा कठीण प्रश्न विचारला, की ज्याचे उत्तर देण्यासाठी राम चरणला त्याच्या समर्थनासाठी पुढे यावे लागले. यावेळी एनटीआरला विचारण्यात आलं होतं की, 'RRR' मध्ये राम चरणने सर्वात जास्त स्तुती आहे? तुम्हाला कस वाटत आहे? यानंतर अल्लू सीतारामची भूमिका साकारणारा अभिनेता राम चरण लगेच पुढे आला आणि म्हणाला की, ''असं काही नाही… NTR ने चित्रपटात मोठी भूमिका साकारली आहे. आणि मला वाटते की त्याने अनेक दृश्यांमध्ये माझ्यावर वर्चस्व गाजवलं आहे. आम्ही दोघांनी खूप सुंदर अभिनय केला आहे. मात्र Jr. NTR च्या भूमिकेवरसुद्धा लोक प्रचंड आनंदी आहेत. आणि भरभरून त्याचं कौतुक करत आहेत.
  Jr. NTR चे काही चाहते चित्रपटात त्याच्या भूमिकेच्या कमी महत्व दिल्याने नाराज आहेत. परंतु अभिनेत्याने स्वतः या गोष्टीला नकार दिला आहे. याबद्दल त्याने म्हटलं आहे, ''RRR मधील त्याची भूमिका आतापर्यंतच्या त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिका आहे.प्रमोशनदरम्यानही, राम चरणने म्हटलं होतं की, त्याला त्याच्या ऐवजी एनटीआरची भूमिका करायची होती. यावरून हे दिसून येते की स्पर्धात्मक वातावरणात चित्रपटात दोघांनाही समान महत्त्व देण्यात आले होते.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, South indian actor

  पुढील बातम्या