मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: हासिलला का मिळाला नाही राष्ट्रीय पुरस्कार? तिग्मांशू धुलियानं सांगितलं धक्कादायक कारण

HBD: हासिलला का मिळाला नाही राष्ट्रीय पुरस्कार? तिग्मांशू धुलियानं सांगितलं धक्कादायक कारण

आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. यापैकी बहुतांशी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळालं. परंतु 'हासिल' या चित्रपटाला नॅशन अवॉर्ड (national award) न मिळाल्यामुळं तो विशेष नाराज झाला होता.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 2 जुलै: तिग्मांशू धुलिया (Tigmanshu Dhulia) हा बॉलिवूडमधील अत्यंत प्रयोगशिल दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. ‘बँडिड क्वीन’, ‘बॉम्बे ब्लू’, ‘दिल से’, ‘हासिल’, ‘गँगस्टर’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारा तिग्मांशू गेली दोन दशकं सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आज तिग्मांशूचा वाढदिवस आहे. (Tigmanshu Dhulia birthday) 54 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यानं आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. यापैकी बहुतांशी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळालं. परंतु 'हासिल' या चित्रपटाला नॅशन अवॉर्ड (national award) न मिळाल्यामुळं तो विशेष नाराज झाला होता.

‘निर्मात्यांना फोन करुन भीक मागते’; कंगनानं पुन्हा एकदा घेतला तापसीसोबत पंगा

अलकिडेच दिलेल्या मुलाखतीत त्यानं हासिल या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड न मिळण्याचं कारण सांगितलं होतं. “आम्ही चित्रपटाची निर्मिती केली. परंतु वर्ष लोटलं तरी आम्हाला तो प्रदर्शितच करता आला नाही. आम्ही मुंबईतील सर्व मोठ्या डिस्ट्रीब्यूटर, निर्माता, कलाकार यांना चित्रपट दाखवला सगळ्यांनी प्रशंसा केली. मात्र खरेदी कुणीच केला नाही, सगळ्यांना असचं वाटत होतं की इरफान सारखा नवा चेहरा पाहून लोक चित्रपटगृहाकडे वळतील का? मात्र एक वर्षानंतर श्रृंगार फिल्मसने चित्रपटाला डिस्ट्रीब्युट करण्याची तयारी दर्शवली. पहिल्यांदा विशाल भारद्वाजने इरफानला पाहिलं आणि त्याला 'मकबूल'मध्ये घेतलं, मकबूल' हा चित्रपट 'हासिल'नंतर बनायला सुरुवात झाला होता, मात्र तो आधी प्रदर्शित झाला.”

ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या संजना गलराणीनं केलं गुपचूप लग्न; पतीसाठी स्विकारला मुस्लिम धर्म

“या चित्रपटाला निर्मात्यांनी योग्य पद्धतीने प्रदर्शित केलं नाही. यामुळं माझं त्यांच्यासोबत भांडण देखील झालं होतं. परिणामी त्यांनी चित्रपटाला नॅशनल अवार्डच्या नॉमिनेशनसाठी पाठवलं नाही. नाहीतर मला विश्वास होता की, या चित्रपटासाठी मला किंवा इरफानला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाच असता.”

First published:

Tags: Birthday celebration, Entertainment, Manoj Bajpayee