• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘निर्मात्यांना फोन करुन भीक मागते’; कंगनानं पुन्हा एकदा घेतला तापसीसोबत पंगा

‘निर्मात्यांना फोन करुन भीक मागते’; कंगनानं पुन्हा एकदा घेतला तापसीसोबत पंगा

ती निर्मात्यांकडे काम मिळवण्यासाठी भीक मागते. मी सोडलेले चित्रपट मिळवण्यासाठी प्रयत्न करते अशी जोरदार टीका कंगनानं तापसीवर केली.

 • Share this:
  मुंबई 2 जुलै: कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घडामोडिंपासून देशभरातील राजकारणावर ती टीका-टिप्पणी करताना दिसते. यावेळी तिने अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिच्यासोबत पंगा घेतला आहे. ती निर्मात्यांकडे काम मिळवण्यासाठी भीक मागते. मी सोडलेले चित्रपट मिळवण्यासाठी प्रयत्न करते अशी जोरदार टीका कंगनानं तापसीवर केली. (Kangana Ranaut reacts to Taapsee Pannu calling her irrelevant) तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान तापसीनं कंगनावर भाष्य केलं होतं. तिच्याकडे दुर्लक्ष करा ती काहीही बरळत असते. तिला महत्व देण्याची बिलकूल गरज नाही. असं म्हणत तिनं कंगनाची खिल्ली उडवली होती. यावर कंगनानं तिला प्रत्युत्तर दिलं आहे. “ही निर्मात्यांना फोन करुन मला काम द्या अशी भीक मागते. कंगना यांनी काही सोडलं असेल तर मला द्या. ही कधीकाळी माझी स्तुती करायची. गरीब निर्मात्यांसोबत कंगनाच उभी राहाते असं म्हणायची. अन् आता माझ्यावरच टीका करतेय?” अशा आशयाच्या पोस्ट लिहून कंगनानं तापसीवर जोरदार टीका केली आहे. ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या संजना गलराणीनं केलं गुपचूप लग्न; पतीसाठी स्विकारला मुस्लिम धर्म ब्रिटनी प्रकरणात शिबानी दांडेकरची उडी; करतेय महिलांच्या स्वातंत्र्याची मागणी कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर चाहते सध्या तिच्या ‘थलाईवी’ या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनचं चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. कंगनाच्या या चित्रपटाला एक दिवसापूर्वीचं सेन्सॉर बोर्डकडून ‘यू’ सर्टिफिकेट मिळालं आहे. कंगनाचा हा चित्रपट 23 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: