मुंबई 3 जुलै: शोले (Sholay) हा भारतीय सिनेइतिहासातील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. जबरदस्त गाणी, धमाकेदार डायलॉग्स, कॉमेडी आणि अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांच्या जुगलबंदीचा तडका यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. (Why sholay is so famous) जवळपास 46 वर्षांनंतरही हा चित्रपट कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. यावेळी शोले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांना देखील विचारण्यात आलं होतं. परंतु त्यांनी त्यावेळी नकार दिला होता. अन् आजही त्यांना त्या नकाराचा पश्चाताप होतो.
आमिर-किरणच्या घटस्फोटाला फातिमा जबाबदार? सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल
शत्रुघ्न सिन्हा (Indian Idol) यांनी अलिकडेच इंडियन आयडल या शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “रमेश सिप्पी यांनी मला शोलेसाठी विचारलं होतं. परंतु मी त्यांना नकार दिला. कारण त्यावेळी मी आधिच दोन प्रोजेक्ट स्विकारले होते. त्यामुळं कामाचा माझ्यावर प्रचंड ताण होता. शिवाय त्या काळात मी सातत्यानं मल्टिस्टारर चित्रपट करत होतो. अन् त्याचा मला खरंच कंटाळा आला होता. त्यामुळं मी रमेश सिप्पी यांना नकार दिला. पण आज मला त्या नकाराचा पश्चाताप होतो. का मी शोले ला नकार दिला याबाबत मी आजही विचार करतो.”
उमेश कामतनं 8 वर्ष का केलं नाही कुठल्याही मालिकेत काम? सांगितलं खरं कारण
शत्रुघ्न सिन्हा हे बॉलिवूडमधील एक सुपरस्टार अभिनेते आहेत. 70-80 चं दशक त्यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर गाजवलं होतं. त्यांनी शोलेला जरी नकार दिला असला तरी प्रेम पुजारी, भाई हो तो ऐसा, खिलोना, दो यार, विश्वनाथ यांसारख्या कित्येक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दमदार आवाज आणि अक्शन सीन्ससाठी ते प्रसिद्ध होते. त्यांना बॉलिवूडचे शोमॅन असंही म्हटलं जायचं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Movie review, Shatrughan sinha, Sholay-style