Home /News /entertainment /

उमेश कामतनं 8 वर्ष का केलं नाही कुठल्याही मालिकेत काम? सांगितलं खरं कारण

उमेश कामतनं 8 वर्ष का केलं नाही कुठल्याही मालिकेत काम? सांगितलं खरं कारण

तब्बल आठ वर्षानंतर तो छोट्या पडद्यावर पुनरागम करतोय. मात्र तो इतके वर्ष छोट्या पडद्यापासून दूर का होता? याच कारण देखील त्यानं आपल्या चाहत्यांना सांगितलं.

    मुंबई 3 जुलै: उमेश कामत (Umesh kamat) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. धुरळा, स्माईल प्लिज, पटलं तर घ्या, टाईम प्लिज यांसारख्या कित्येक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेला उमेश गेली जवळपास दोन दशकं सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (Umesh kamat movie) आता हा अष्टपैलू अभिनेता ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Ajunahi Barsaat Ahe) लक्षवेधी बाब म्हणजे तब्बल आठ वर्षानंतर तो छोट्या पडद्यावर पुनरागम करतोय. मात्र तो इतके वर्ष छोट्या पडद्यापासून दूर का होता? याच कारण देखील त्यानं आपल्या चाहत्यांना सांगितलं. आमिर-किरणच्या घटस्फोटाला फातिमा जबाबदार? सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल उमेशनं ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेच्या निमित्तानं टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं आपल्या करिअरवर भाष्य करत असताना छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, “निर्मात्यांमुळे ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत मी काम करण्याचा निर्णय घेतला. खरं तर गेली अनेक वर्ष मला विविध मालिकांसाठी विचारलं जात होतं. परंतु विषयांमध्ये मला वेगळेपणा जाणवत नव्हता त्यामुळं मी नकार देत होतो. पण या मालिकेत मी शोधत असलेलं वेगळेपण मला जाणवलं मी काम करण्याचा निर्णय घेतला. शिवाय यामध्ये मुक्ता बर्वे देखील झळकणार आहे. ती खूपच हुशार अभिनेत्री आहे. तिच्याकडून कामय खूप काही शिकता येतं अन् ही संधी मला सोडायची नव्हती. शिवाय गेली अनेक वर्ष मला सोनी टीव्ही तर्फे काम करण्याबाबत विचारलं जात होतं. या तीन मुद्दयांचा मी विचार केला अन् मालिकेसाठी होकार दिला.”
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Actor, Entertainment, TV serials

    पुढील बातम्या