गेले काही महिने दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अखेर या बातम्या खऱ्या निघाल्या.
|
1/ 10
आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं. आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिरनं जवळपास 15 वर्ष किरणसोबत संसार केला.
2/ 10
परंतु गेले काही महिने दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अखेर या बातम्या खऱ्या निघाल्या.
3/ 10
आमिर आणि किरण यांनी घटस्फोट घेतला आहे. आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट जारी करत ही धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली.
4/ 10
लक्षवेधी बाब म्हणजे आमिर आणि किरणचा घटस्फोट होणार ही बातमी समोर येताच काही नेटकऱ्यांनी अभिनेत्री फातिमा सना शेख हिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
5/ 10
फातिमासोबत असलेल्या संबंधांमुळेच आमिरनं किरणला घटस्फोट दिला अशी चर्चा सर्वत्र केली जात आहे.
6/ 10
फातिमा आणि आमिर यांनी ठग्स ऑफ हिंदुस्तान आणि दंगल या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.
7/ 10
या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. अर्थात यामुळेच किरणनं आमिरला घटस्फोट दिला असा कयास काही नेटकरी बांधत आहेत. शिवाय फतिमाला आमिर खानच्या घटस्फोटामुळं ट्रोल देखील केलं जात आहे.
8/ 10
“या 15 वर्षा सुंदर वर्षात आम्ही एकत्र जीवनभरातील अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं आहे आणि आमचं नातं केवळ विश्वास, सन्मान आणि प्रेमामुळं वृद्धिंगत झालं आहे.” असं स्टेटमेंट त्यांनी जारी केलं आहे.
9/ 10
किरणच्या आधी आमिर खानचं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. 2000 साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर किरण राव आणि आमिर खान यांचं लग्न झालं.
10/ 10
केवळ एका फोनच्या संभाषणानंतर आमिर खान आणि किरण राव मनाने एकमेकांच्या जवळ आले होते.