#sholay style

VIDEO : 5 व्या मजल्यावर चढून अल्पवयीन मुलीचा 'शोले स्टाईल' राडा

महाराष्ट्रJan 11, 2019

VIDEO : 5 व्या मजल्यावर चढून अल्पवयीन मुलीचा 'शोले स्टाईल' राडा

नितीन बनसोडे, 11 जानेवारी : शहरातील शिवाजी चौकाला लागून असलेल्या इमारतीवर चढून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने इमारतीवर चढून 'शोले स्टाईल' आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तब्बल दीड तास हा ड्रामा सुरू होता. अखेर पोलिसांनी अथक प्रयत्न करून त्या मुलीला ताब्यात घेतले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. शिवाजी चौकाला लागूनच सोमाणी यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास एका अल्पवयीन मुलीने या बांधकाम सुरू असलेल्या इमरतीचा 5 वा मजला गाठला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रास्तावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी पहिला आणि एकच गोंधळ उडाला. त्वरित शिवाजी चौक पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर दीड तासांच्या अथक परीश्रमानंतर पोलिसांनी मुलीची समजूत काढली आणि तिला खाली उतरवले.