मुंबई 27 जून : भारतातील सगळ्यात यशस्वी संगीतकारांमध्ये राहुल देव बर्मन (Rahul Dev Burman) म्हणजेच आर. डी. बर्मन (R.D. Burman) यांचा समावेश होतो. आजवर अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी केली. तर आजची पिढीही त्यांची गाणी अगदी उत्साहात ऐकते. पंचम दा अशी ओळख असणाऱ्या बर्मन यांचा जन्म 27 जून 1939 ला पश्चिम बंगालमध्ये झाला होता. प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन हे त्यांचे वडिल होते. आर. डी. बर्मन यांनी तब्बल 331 चित्रपटांसाठी संगीत दिलं होतं. तर त्यांची जवळपास सगळीच गाणी ही सुपरहिट ठरली होती. 90 च्या दशकात त्यांच्या गाण्यांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं होतं. किशोर कुमार, आशा भोसले, लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी अनेक गाणी गायली होती. याचं दरम्यान बर्मन यांना आशा भोसलेंवर प्रेम झालं होतं. मात्र आशा भोसले यांना हे लग्न मान्य नव्हतं.
आशा आणि बर्मन यांची प्रेमकाहानी ही संगीतमय, दुःखद आणि तितकीच त्यागमयही होती. पंचम म्हणजेच बर्मन यांचं 1966 साली आधी एक लग्न झालं होतं. मात्र ते आपल्या विवाहात खुश नव्हते. रिता पटेल यांच्याशी पंचम यांनी 1971 साली घटस्फोट घेतला. दुसरीकडे आशा यांचही लग्न झालेलं होतं. लग्नाच्या काही वर्षातच 1966 साली आशा यांचे पती म्हणजेच गणपतराव भोसले यांचं निधन झालं होतं.
पंचम आणि आशा दोघेही त्यांच्या जीवनात अतिशय एकटे होते. पंचम यांना आधीपासूनच आशा आवडत होत्या. त्यांनी आशां भोसलेंना लग्नासाठी विचारलं मात्र त्याक्षणी त्यांनी नकार दिला. आशा या पंचम यांच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठ्या होत्या. मात्र त्यामागे हे कारण नव्हतं. आशा या आपल्या पतीच्या निधनाचं दुःख अद्याप पचवू शकल्या नव्हत्या त्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला होता. त्यावेळी लतादिदींनी आशा यांची मनभरणी केल्याचं पंचम यांनी सांगितलं होतं. ‘पिया तू अब तो आजा’ आणि ‘दम मारो दम’ ही त्यांनी एकत्रित गायलेली गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती.
अखेर 1980 मध्ये पंचम यांच्या घटस्फोटाच्या 9 वर्षानंतर आशा आणि बर्मन यांनी विवाह केला. आशा आणि बर्मन यांचा सुखाचा संसार सुरू होता पण काही कालावधीनंतर बर्मन यांना दारुचं भयानक व्यसन लागलं. त्यामुळे त्यांच्यात काही विवादही होत होते. पण त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नव्हती. अखेर 1994 मध्ये वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी बर्मन यांचा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यु झाला.

)







