Home /News /entertainment /

जेठालालची ‘गुलाबो’ खऱ्या आयुष्यात आहे डेंजर; सलमानचही तोंड केलं होतं बंद

जेठालालची ‘गुलाबो’ खऱ्या आयुष्यात आहे डेंजर; सलमानचही तोंड केलं होतं बंद

गुलाबोच्या छोट्याशाच भूमिकेतून तिनं रसिकांना घायाळ केलं. 2002मध्ये अभिनय क्षेत्रात आलेल्या सिंपलनं कुसुम, शरारत, कुटुंब, ये मेरी लाइफ है, बा बहू और बेटी अशा अनेक मालिकांमधून काम केलं आहे.

    मुंबई 26 जून: सब टीव्हीवरील तारक मेहता का उलटा चष्मा (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah-TMOC) ही मालिका गेली अनेक वर्षं रसिकांचं मनोरंजन करत आहे. कथानकातलं नावीन्य, गंभीर विषयही विनोदाची झालर लावून मांडण्याची धाटणी, चुरचुरीत संवाद आणि नामवंत कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळं ही मालिका अनेक वर्षं लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्रदीर्घ काळ चाललेली एक लोकप्रिय मालिका असा या मालिकेचा नावलौकिक आहे. या मालिकेतलं एक प्रमुख पात्र आहे जेठालाल (Jethalal). अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) अत्यंत उत्कृष्टपणे ही भूमिका साकारत आहेत. दिलीप जोशी म्हणजे जेठालाल असं समीकरण पक्कं झालं आहे, इतके ते या भूमिकेत चपखल बसले आहेत. त्यांची पत्नी दयाबेन हे देखील या मालिकेतलं लोकप्रिय पात्र. या मालिकेतले अनेक कलाकार या मालिकेमुळेच लोकप्रिय झाले आहेत. लोक त्यांना त्यांच्या पात्रांच्या नावानेच ओळखतात. या मालिकेत सतत काही तरी नवीन घडत असतं. त्या अनुषंगानं कथानकात नवनवीन पात्रांची ये-जा होत असते. या मालिकेत अशाच एका पात्राच्या भूमिकेतून पदार्पण केलेल्या सिंपल कौलनंदेखील (Simple Kaul) रसिकांचं मन जिंकलं होतं. जेठालालची काश्मिरी पत्नी गुलाबो (Gulabo) या भूमिकेतून तिनं या मालिकेत प्रवेश केला होता. आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं तिनं रसिकांवर चांगलीच जादू केली होती. Fat समीरा रेड्डी कशी झाली Fit? वजन कमी करण्यासाठी वापरली अनोखी टेकनिक जेठालाल मित्रांबरोबर काश्मीरला (Kashmir) गेलेला असताना एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये त्यानं भाग घेतला होता. त्यात त्यानं गुलाबोच्या पतीची भूमिका बजावली होती; पण गुलाबोला जेठालाल इतका आवडला की तिनं त्याला खराच पती मानलं आणि नंतर ती त्याच्या शोधात मुंबईला जेठालालच्या गोकुलधाम सोसायटीत येऊन थडकली. तिथं तिनं तंबू ठोकला, कोर्टात केस केली; पण अखेर दयाभाभीच्या सच्च्या प्रेमापुढं गुलाबोचं काहीही चाललं नाही आणि तिला निघून जावं लागलं. अशी ही गुलाबो साकारली होती सिंपल कौल हिनं. ‘3 वर्ष काम शोधत होतो’; फॅमेली मॅनमधील जेके तळपदे कर्जबाजारीपणामुळं झाला होता बेजार गुलाबोच्या छोट्याशाच भूमिकेतून तिनं रसिकांना घायाळ केलं. 2002मध्ये अभिनय क्षेत्रात आलेल्या सिंपलनं कुसुम, शरारत, कुटुंब, ये मेरी लाइफ है, बा बहू और बेटी अशा अनेक मालिकांमधून काम केलं आहे. याशिवाय ती एक बिझनेस वूमन (Business Woman) आहे. बिग बॉसच्या 12 व्या (Big Boss-12) सीझनमध्येही ती होती; पण त्या शोचा होस्ट सलमान खानची (Salman Khan) एक गोष्ट तिला आवडली नाही. तेव्हा तिनं करणवीर बोहरा याला पाठिंबा देताना चक्क सलमान खानशी पंगा घेऊन ट्विटरवर त्याची चांगलीच खरडपट्टी काढली होती. प्रत्यक्ष आयुष्यातही सिंपल अतिशय बोल्ड असून, आपले ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांची संख्याही प्रचंड आहे.
    First published:

    Tags: Bold photoshoot, Bollywood actress, Tarak mehta ka ooltah chashmah

    पुढील बातम्या