मुंबई 7 जून: बालाजी टेलिफिल्मची सर्वेसर्वा एकता कपूर (Ekta Kapoor) हिला छोट्या पडद्यावरची क्विन असं म्हणतात. ‘क्योकी सास भी कभी बहु थी’, ‘कुसुम’, ‘कहानी घर घर की’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘बडे अच्छे लगते है’ यांसारख्या कित्येक सुपरहिट मालिकांद्वारे गेली दोन दशकं ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तिनं आजवर शेकडो नव्या कलाकारांना मालिकांद्वारे करिअर सुरु करण्यासाठी मदत केली. परंतु करिअरमध्ये यशाचं शिखर गाठणारी एकता वैयक्तिक आयुष्यात मात्र फारच एकटी आहे. (Why isnt Ekta Kapoor married) वैयक्तिक आयुष्यात कायमच तिच्या हाती निराशा लागली. आज एकताचा वाढदिवस आहे. (Ekta Kapoor birthday) या निमित्तानं जाणून घेऊ लग्न न घेण्याचा निर्णय तिनं का घेतला?
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत एकतानं आपल्या करिअरवर भाष्य केलं होतं. त्यावेळी तिनं लग्न न करण्याचं कारणही सांगितलं. एकताला पार्ट्यांमध्ये जाण्याची भरपुर हौस होती. ती रात्रभर मित्र-मंडळींसोबत धम्माल मस्ती करायची. अर्थात तिची ही सवय आई-वडिलांना आवडत नव्हती. त्वरीत या गोष्टी तिनं थांबवाव्यात अन्यथा तिचं लग्न लावून दिलं जाईल, असा धमकीवजा इशारा त्यांनी एकता दिला. मग लग्न टाळण्यासाठी तिनं काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती एका जाहिरात एजंसीमध्ये नोकरी करत होती. त्यावेळी ती केवळ 18 वर्षाची होती. या कंपनीत काम करताना एखादी मालिका तयार करण्याची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली.
'या' चित्रपटासाठी आमिरने चक्क 12 दिवस केली नव्हती आंघोळ, वाचा भन्नाट किस्सा
मग एकतानं 1995 साली आपल्या वडिलांच्या मदतीनं ‘पडोसन’ ही मालिका तयार केली. या मालिकेला फारसं यश मिळालं नाही. पण मग तिनं ‘कॅप्टन हाऊस’ आणि ‘मानो या ना मानो’ अशा आणखी दोन फ्लॉप मालिका तयार केल्या. सातत्यानं मिळणाऱ्या अपयशामुळं ती त्रस्त होती. त्याच वेळी तिनं ‘हम पांच’ ही विनोदी मालिका तयार केली. अशोक सराफ यांच्या युनिक टाईमिंगमुळं ही मालिका तुफान गाजली. अन् तिथूनच तिच्या करिअरला खऱ्या अर्थान सुरुवात झाली. त्यानंतर एकतानं मागे वळून पाहिलंच नाही. क्योकी सास भी कभी बहु थी, कुसुम, कहानी घर घर की, कसौटी जिंदगी की, बडे अच्छे लगते है यांसारख्या एकामागून एक सलग सुपरहिट मालिकांची निर्मिती ती करत गेली.
कुप्रसिद्ध राजा-राणी? मेगन-हॅरी यांना रॉयल्स लिस्टमध्ये मिळालं सर्वात खालचं स्थान
याच काळात तिनं लग्न करावं अशी इच्छा कुटुंबीय वारंवार व्यक्त करत होते. पण एकताला लग्न करुन आपल्या करिअरला ब्रेक लावायचा नव्हता. कौटुंबीक जबाबदाऱ्या अंगावर पडल्या तर ती आपल्या करिअरला न्याय देऊ शकणार नाही अशी भीती तिला वाटत होती. याच दृष्टीकोनामुळं तीन वेळा ब्रेकअपसुद्धा झाल्याचं तिनं मान्य केलं. पण तिनं आपलं पूर्ण लक्ष करिअरवर केंद्रित ठेवलं. त्यामुळं तिनं लग्न केलं नाही अन् आता करण्याची इच्छाही तिच्या मनात उरलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.