मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'या' चित्रपटासाठी आमिरने चक्क 12 दिवस केली नव्हती आंघोळ, वाचा भन्नाट किस्सा

'या' चित्रपटासाठी आमिरने चक्क 12 दिवस केली नव्हती आंघोळ, वाचा भन्नाट किस्सा

 बॉलिवूड अभिनेता आमिर खान(Aamir Khan) म्हणूनच मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान(Aamir Khan) म्हणूनच मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान(Aamir Khan) म्हणूनच मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो.

मुंबई, 6 जून-  बॉलिवूड कलाकारांचं (Bollywood Star) आयुष्य जितकं रॉयल असतं, त्यापाठीमागे तितकीच त्यांची मेहनतसुद्धा असते. असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या चित्रपटातील प्रत्येक सीन परफेक्ट होण्यासाठी वाटेल ते कष्ट घ्यायला तयार असतात. बॉलिवूड अभिनेता आमिर खान(Aamir Khan) म्हणूनच मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आमिर आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड कष्ट घेत असतो. आपल्या अभिनयापासून आपल्या लूकपर्यंत प्रत्येक गोष्टीवर आमिर बारीक लक्ष देतो. ‘गुलाम’(Gulam) या चित्रपटासाठी सुद्धा आमिरने असचं काहीसं केलं होतं.

" isDesktop="true" id="561531" >

‘गुलाम’ या चित्रपटाचा शेवटचा भाग चित्रित केला जाणार होता. या सीनमध्ये आमिर खानला अगदी मार खाऊन चेहरा वगैरे पूर्ण खराब झालेला दाखवायचा होता. यामध्ये आमिरचा चेहरा पूर्ण डल पडलेला हवा होता. म्हणूनचं सीन परफेक्ट व्हावा आणि तो अगदी खरा वाटावा, यासाठी आमिरने तब्बल 12 दिवस आंघोळ केली नव्हती. आश्चर्य वाटलं ना. मात्र हे सत्य आहे. आमिरला 12 दिवस आंघोळ नं करणं खुपचं कठीण होतं. त्याला त्याचा त्रास देखील होतं होता. मात्र आपला सीन परफेक्ट व्हावा म्हणून आमिरनं हे कष्टसुद्धा पचवले होते. म्हणूनचं त्याला बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं.

(हे वाचा:अभिनेत्री खासदार नुसरत जहाँ 6 महिन्यांची गर्भवती? पतीशी घटस्फोटच्या देखील चर्चा  )

आमिरने ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. आमिरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आमिरने आपल्या प्रत्येक चित्रपटातून एक नवा विषय हाताळला आहे. मग तारे जमीन पर असेल, पीके असेल किंवा अलीकडेच आलेला सिक्रेट सुपरस्टार. आमिरने ‘दंगल’ या चित्रपटासाठी तर मोठ्या प्रमाणात आपलं वजन वाढवलं होतं. आणि चित्रपटानंतर पुन्हा ते वजन कमीसुद्धा केलं होतं. तसेच ‘धूम 3’ साठीसुद्धा आमिरने अशीच मेहनत घेतली होती.

First published:
top videos