कोण आहे श्रुती मोदी? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनंतर पाटणा पोलीसही करणार चौकशी

कोण आहे श्रुती मोदी? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनंतर पाटणा पोलीसही करणार चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पाटणा पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान सुशांतच्या मृत्यूआधी त्याची ज्या लोकांशी बातचीत झाली होती, त्या सर्वांची स्वतंत्रपणे पाटणा पोलीस चौकशी करणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास आता पाटणा पोलीस स्वतंत्रपणे करत आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आधीच 35 हून अधिक जणांचे जबाब नोंदवले होते. आता पाटणा पोलिसानी देखील आतापर्यंत 3 जणांचा जबाब नोंदवला आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर पाटणा पोलिसांच्या तपासास सुरुवात झाली. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांबरोबर आणखी एक नाव घेतले आहे, ते म्हणजे - श्रुती मोदी.

कोण आहे श्रुती मोदी?

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांबरोबर श्रुती मोदी हे देखील नाव आहे. यानंतर श्रुती मोदीचे सुशांतच्या मृत्यूशी काय कनेक्शन आहे, असे सवाल उपस्थित झाले होते. दरम्यान अशी माहिती समोर येत आहे की, श्रुती मोदी या महिलेने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीची मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे.

(हे वाचा-अंकिता लोखंडेला कुणापासून धोका? अभिनेत्रीला दिलं जाणार पोलीस संरक्षण - सूत्र)

सुशांतच्या कंपनीमध्ये रिया-शोविकचे सर्व काम श्रुती पाहायची. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी याआधी श्रुतीची चौकशी केली आहे. आता पाटणा पोलीस देखील तिच्या पत्त्यावर जाऊन श्रुतीची चौकशी करू शकतात. यामुळे सुशांतच्या मृत्यू प्रकरणात काहीतरी धागेदोरे सापडतील अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

पाटणा पोलिसांकडून पुन्हा होतेय चौकशी

आज सुशांतच्या मेडिकल टीमबरोबरच आज अंकिता लोखंडेची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पाटणा पोलिसांकडून या प्रकरणात तिघांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. सुशांतचा जवळचा मित्र महेश शेट्टी, त्याचा जुना कुक आणि सुशांतची बहिण मितू सिंह यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील संबंधित सर्व व्यक्तींची पाटणा पोलीस चौकशी करणार आहेत. मितू सिंह यांनी चौकशीमध्ये असा खुलासा केला आहे की सुशांतच्या आत्महत्येआधी 2 दिवस सुशांत आणि रियामध्ये भांडण झाले होते.

(हे वाचा-आशुतोष भाकरेने फेसबुकवर दिले होते आत्महत्येचे संकेत? शेअर केला होता VIDEO)

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर पाटणा पोलीस चौकशी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सुशांतच्या वडिलांकडे असे काही चॅट आहेत, ज्यामध्ये सुशांतबाबत बोलण्यात आले होते. याचदरम्यान त्यांनी असा आरोप देखील केला आहे की, सुशांतचा नंबर बदलून रियाने त्याला कुटुंबापासून दूर करण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यामुळे ते चिंतेत असल्याने त्यांनी सुशांतच्या बहिणीला देखील त्याच्याशी बोलण्यासाठी पाठवले होते. तिने जाणूनबुजून सुशांतला घर बदलण्यास भाग पाडले, या केके सिंह यांंच्या आरोपाबाबत देखील पाटणा पोलीस चौकशी करणार आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 30, 2020, 12:12 PM IST

ताज्या बातम्या