मुंबई, 30 जुलै : अभिनेता आशुतोष भाकरे (Aashutosh Bhakare) च्या आत्महत्येमुळे मराठी सिनेसृष्टीमध्ये खळबळ माजली आहे. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान महिनाभरापूर्वी आशुतोषने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून आत्महत्येसंदर्भात भाष्य करणारा व्हिडीओ शेअर केला होता. एका डॉक्टरचा हा व्हिडीओ आहे. जगण्याची उमेद एखाद्यामध्ये जास्त असते, आपण एखाद्या व्यक्तीला मदत केल्यास त्याला आत्महत्या करण्यापासून वाचवू शकतो याबाबत मार्गदर्शन करणारा हा व्हिडीओ आहे. आशुतोषने त्याच्या फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला होता. त्याने हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे महिनाभर आधीपासून तो कोणत्या विचारात होता याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
(हे वाचा-मयुरी-आशुतोषची लव्ह स्टोरी, असं जुळलं होतं अरेंज्ड मॅरेज... पाहा PHOTOS)
'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आणि नवोदित कलाकार आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आशुतोष यानं काही मराठी चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आशुतोष भाकरे यानं आत्महत्या केल्यानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आशुतोष भाकरे याने ने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केलं आहे.
(हे वाचा-'सत्याचा विजय होतो',रियावर FIR दाखल झाल्यानंतर EX-गर्लफ्रेंड अंकिताचे सूचक ट्वीट)
मिळालेल्या माहितीनुसार आशुतोष गेल्या काही काळापासून नैराश्यात होता. त्याने हा व्हिडीओ देखील शेअर केला होता. मात्र तो इतक्या टोकाचा निर्णय घेईल असे कुणाला वाटले नव्हते. आशुतोष आणि मयुरी देशमुख 21 जानेवारी 2016 रोजी लग्नबंधनात अडकले होते. 2017 साली मयुरीने ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने एका प्रसिद्ध वृत्तपत्रात दोघांची लव्हस्टोरी प्रकाशित झाली होती.
मयुरी आज यशाच्या शिखरावर आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. मयुरीने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले नाटक ‘डिअर आजो’ने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सध्या तिचे 'तिसरे बादशहा हम हे' नाटक सुरु होते. याशिवाय 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', '31 दिवस' अशा काही चित्रपटात तिनं भूमिका साकारली आहे. अशावेळी आशुतोषने उचललेले टोकाचे पाऊल मनाला चटका लावणारे आहे.