अंकिता लोखंडेला कुणापासून धोका? अभिनेत्रीला दिलं जाणार पोलीस संरक्षण - सूत्र

अंकिता लोखंडेला कुणापासून धोका? अभिनेत्रीला दिलं जाणार पोलीस संरक्षण - सूत्र

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्याबाबत एक नवी माहिती समोर येत आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेला सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याकडून मिळते आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death) प्रकरणाला गेल्या काही दिवसात वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास आता बिहार पोलिसांनी देखील सुरु आहे. बिहार पोलीस याबाबत स्वतंत्रपणे चौकशी करत आहेत. दरम्यान सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्याबाबत एक नवी माहिती समोर येत आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेला सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याकडून मिळते आहे. सुरक्षेसंदर्भात अंकिताने चर्चा केली होती. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या या माहितीनंतर असा सवाल उपस्थित राहतो आहे की अंकिता लोखंडेला नेमका कुणापासून धोका आहे?

दरम्यान सुशांतच्या मृत्यूप्रकरणी पाटणा पोलीस चौकशी करत आहेत. तर आज सुशांतच्या मेडिकल टीमबरोबरच आज अंकिताची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पाटणा पोलिसांकडून या प्रकरणात तिघांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. सुशांतचा जवळचा मित्र महेश शेट्टी, त्याचा जुना कुक आणि सुशांतची बहिण मितू सिंह यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील संबंधित सर्व व्यक्तींची पाटणा पोलीस चौकशी करणार आहेत.

(हे वाचा-आशुतोष भाकरेने फेसबुकवर दिले होते आत्महत्येचे संकेत? शेअर केला होता VIDEO)

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर पाटणा पोलीस चौकशी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सुशांतच्या वडिलांकडे असे काही चॅट आहेत, ज्यामध्ये सुशांतबाबत बोलण्यात आले होते. याचदरम्यान त्यांनी असा आरोप देखील केला आहे की, सुशांतचा नंबर बदलून रियाने त्याला कुटुंबापासून दूर करण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यामुळे ते चिंतेत असल्याने त्यांनी सुशांतच्या बहिणीला देखील त्याच्याशी बोलण्यासाठी पाठवले होते. तिने जाणूनबुजून सुशांतला घर बदलण्यास भाग पाडले, या केके सिंह यांंच्या आरोपाबाबत देखील पाटणा पोलीस चौकशी करणार आहेत.

'सत्याचा विजय होतो'

दरम्यान सुशांतचे वडील केके सिंह यांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केल, त्यानंतर मुंबईत दाखल झालेल्या पाटणा पोलिसांच्या 4 सदस्यीय टीमने याबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान लगेचच अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने ट्विटरवर 'सत्याचा विजय होतो' (Truth Wins) अशी पोस्ट केली होती.

(हे वाचा-'पाकिस्तानी एजंटला लग्नात बोलावले, JNU निषेधाचा कट रचला',कंगनाचा दीपिकावर निशाणा)

सुशांतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे पूर्णपणे कोलमडली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर जवळपास महिनाभराने तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने देवासमोर लावलेल्या एका दिव्याचा फोटो शेअर केला होता आणि त्याला CHILD OF GOD असे कॅप्शन दिले होते. त्याचप्रमाणे तिने 'दिल बेचारा'च्या प्रदर्शनाआधी देखील एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने सुशांतच्या या शेवटच्या सिनेमाचे पोस्टर शेअर केले होते. त्यानंतर अंकिताने 'TRUTH WINS' अशी पोस्ट केली आहे. यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. पण सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात FIR दाखल झाल्यानंतर अंकिताने हे ट्वीट केले आहे. त्यामुळे तिला देखील याबाबत संशय होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 30, 2020, 11:19 AM IST

ताज्या बातम्या