इरफानच्या आठवणीत पत्नी सुतापा पुन्हा झाली भावुक, इमोशनल पोस्ट लिहून म्हणाली...

इरफानच्या आठवणीत पत्नी सुतापा पुन्हा झाली भावुक, इमोशनल पोस्ट लिहून म्हणाली...

इरफानच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्यावर पती सुतापा सिकदरनं पुन्हा एकदा इमोशनल पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मे : वेळ कसा निघून जातो समजतच नाही. काही काळापूर्वी घडलेली एखादी घटना अगदी कालच घडली की काय असं वाटू लागतं. बॉलिवूड अभिनेता इरफान खानला जाऊन एक महिना पूर्ण झाला. त्याच्या अशा अचानक जाण्यानं अनेकांना धक्का बसला आहे. पण त्याचं कुटुंब अद्याप या धक्क्यातून सावरलेलं नाही. त्याची दोन्ही मुलं त्याच्या आठवणी अनेकदा थ्रोबॅक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतातच पण आता त्याच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्यावर त्याची पती सुतापा सिकदरनं पुन्हा एकदा एक इमोशनल पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.

इरफानची पत्नी सुतापा त्याच्या अखेरच्या काळापर्यंत त्याच्यासोबत होती. ही आशा ठेवून की इरफान लवकर ठिक होईल आणि त्याच्या कुटुंबाचे आनंदाचे क्षण पुन्हा येतील. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. इरफाननं 29 एप्रिलला जगाचा निरोप घेतला. त्याला जाऊन एक महिना पूर्ण झाल्यावर त्याची पत्नी सुतापानं मात्र त्याच्यासाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अक्षयनं बहिणीसाठी बुक केलं संपूर्ण विमान, युजर्स म्हणाले; मजूरांना बस नाही आणि..

सुतापानं इरफानचे काही अनसीन फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, इथून खूप दूर प्रत्येक चूक किंवा बरोबरच्या पलिकडे एक रिकामं मैदान आहे. तिथे मी तुला भेटेन. जेव्हा आपला आत्मा त्या हिरवळीवर शांतपणे झोपलेला असेल आणि हे जग बोलून थकलेलं असेल. बस काही दिवसांचा तर प्रश्न आहे. मग आपण भेटू, गप्पा मारू.

सुतापानं जे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात हे दोघंही कोणत्यातरी पार्कमध्ये आहेत. ज्यातील एका फोटोमध्ये इरफान एकटाच हिरवळीवर झोपलेला आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यानं सुतापासोबत सेल्फी घेतली आहे.

2018 मध्ये इरफानला न्यूरोइंडोक्राइनचं निदान झालं होतं. यावर उपचार घेण्यासाठी तो लंडनला सुद्धा गेला होता. जवळपास वर्षभर उपचार घेतल्यानंतर तो भारतात परतला. त्यानंतर त्यानं बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत बॉलिवूडमध्ये कमबॅक सुद्धा केलं. काही काळापूर्वी रिलीज झालेला 'अंग्रेजी मीडियम' हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरला.

167 महिलांना एअरलिफ्ट करत सोनू सूदची मोठी मदत, कोचीहून ओडिशामध्ये पोहोचवलं

या देशात Lockdownमध्ये पाहिला जातोय ‘बाहुबली’,  लोकांवर आहे बॉलिवूडची जादू!

First published: May 30, 2020, 12:27 PM IST

ताज्या बातम्या