मुंबई, 30 मे : सध्या कोरोना व्हायरसनं संपूर्ण जग वैतागलेलं आहे. या व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं दिसून येतंय अशात काही दिवसांपूर्वीच देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास दोन महिन्यांनंतर लोक विमान प्रवास करत आहेत. अर्थात हे सर्व सरकारनं सांगितलेल्या नियामांनुसार होत आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या या संकटात पहिल्यापासून चर्चेत राहिलेला अभिनेता अक्षय कुमारनं त्याची बहीण आणि तिच्या मुलांसाठी संपूर्ण विमानच बुक केल्याचं समोर आहे. अर्थात अक्षयनं हे सर्व त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी केलं असलं तरीही लोकांच्या मात्र हे पचनी पडलेलं नाही आणि त्यांनी सोशल मीडियावर अक्षयला ट्रोल करायला सुरुवात केली. कोरोनाच्या संक्रमणात अगदी सुरुवातीपासून देशाची सेवा करण्यासाठी तत्पर असणारा अक्षय अशा काळात स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेताना कसा मागे राहिल. मनाचा मोठेपणा दाखवत त्यानं पुन्हा एकदा असं काम केलं की त्यामुळे तो सध्या खूप चर्चेत आला आहे. मुंबई ते दिल्ली असा प्रवास करणार एक विमान असं होतं ज्यात सर्वात कमी प्रवासी होते. ज्यात अक्षय कुमारची बहीण अलका भाटिया तिची मुलं आणि केअर टेकर याचाही समावेश होता आणि संपूर्ण विमानाचं बुकींग अक्षय कुमारनं केलं होतं. या देशात Lockdownमध्ये पाहिला जातोय ‘बाहुबली’, लोकांवर आहे बॉलिवूडची जादू!
It’s always a pleasure talking to you @sonalkalra and if you ever feel low again #TensionNot, you know whom to call 🙃 https://t.co/Vg9TuNIYne
— Akshay Kumar (@akshaykumar) May 29, 2020
या संपूर्ण विमानत केवळ 4 लोकांनी प्रवास केला. ज्यात अक्षय कुमारची बहीण अलका भाटिया तिची दोन मुलं आणि त्यांची केअर टेकर यांचा समावेश होता. अर्थात या सर्वांना कोणत्याही प्रकारची विशेष सुविधा दिली गेली नाही. कोविड 19 संबंधित उपचारांचे प्रोटोकॉल पाळत त्यांनी या विमानातून प्रवास केला. पण जेव्हा ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यावेळी अनेकांनी अक्षय कुमारला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. सध्या देशात अनेक मजूरांना घरी जाण्यासाठी बस नाही ते पायी प्रवास करत आहेत आणि अक्षय कुमारनं त्याच्या फॅमिलीसाठी पूर्ण विमान बुक केलं हे अनेकांना पटलेलं नाही. त्यामुळे अक्षयला ट्रोल केलं जात आहे. ‘जिंदगी कैसी ये पहेली’ सारख्या अजरामर गाण्यांचे गीतकार कवी योगेश यांचं निधन
काही दिवसांपूर्वी भोपाळमध्येही असंच एक विमान बुक करण्यात आलं होतं. भोपाळ ते दिल्ली असं प्रवास करणारं हे विमान एका व्यावसायिकानं त्याची पत्नी मुलं आणि त्यांच्या केअर टेकरसाठी बुक केलं होतं. केवळ सुरक्षेच्या कारणास्तव हे करण्यात आलं होतं. दरम्यान अक्षय कुमारनं आतापर्यांत पीएम केयर्स फंडमध्ये 25 कोटी, बीएमसीसाठी तीन कोटी आणि CINTAA मध्ये 45 लाख रुपये डोनेट केले आहेत. अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘लक्ष्मी बॉम्ब’ देखील OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार