इंटीमेट Photos शेअर करुन फसला नवरा, अभिनेत्री म्हणाली; मी त्याला आधीच...

इंटीमेट Photos शेअर करुन फसला नवरा, अभिनेत्री म्हणाली; मी त्याला आधीच...

नुकतंच एका अभिनेत्रीच्या पतीनं सोशल मीडियावर असे काही फोटो शेअर केले ज्यामुळे इंटरनेटवर त्याला ट्रोल केलं गेलं.

  • Share this:

मुंबई, 30 मे : सध्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आपापल्या घरी आहे. अशात सेलिब्रेटींबद्दल बोलायचं तर सध्या सर्वच सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामतून सध्या हे सेलिब्रेटी सतत ट्रेंडिंगमध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहेत. पण नुकतंच एका अभिनेत्रीच्या पतीनं सोशल मीडियावर असे काही फोटो शेअर केले ज्यामुळे इंटरनेटवर त्याला ट्रोल केलं गेलं. यावर आता या अभिनेत्रीनं प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेननं पत्नी चारू असोपासोबत काही इंटीमेट फोटो शेअर केले होते. ज्यामुळे या दोघांनाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. या फोटोमध्ये चारू आणि राजीव एकमेकांना किस करताना दिसत होते. पण हे फोटो पाहिल्यावर ट्रोलर्सनी राजीव आणि चारूला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. यानंतर राजीवनं हे फोटो डिलिट सुद्धा केले मात्र या फोटोंमुळे या दोघांच्या पर्सनल लाइफमध्ये मात्र समस्या आल्या.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चारूनं सांगितलं, बऱ्याच वेळा अशाप्रकारच्या ट्रोलिंगकडे मी दुर्लक्ष करते. पण मी ते फोटो सोशल मीडियावर शेअर करु नको असं राजीवला सांगितलं होतं. तसं आम्ही एकमेकांना विचारुन कोणतीही पोस्ट करत नाही ज्याला जे आवडतं ते तो व्यक्ती करतो. पण हे फोटो शेअर केल्यानंतर समजलं की आपण ट्रोल झालो आहोत.

चारू पुढे म्हणाली, ट्रोलिंगनंतर मी राजीवला विचारलं मी तुला नको म्हटलेलं असतानाही तू ते फोटो पोस्ट केलेस आणि यावरुन आमच्यात जोरदार भांडण सुद्धा झालं. पण मग सर्व ठिक सुद्धा झालं. खरं तर अशा गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यात काहीच अर्थ नसतो. ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करायला आपण शिकायला हवं. चारू एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे तर राजीव सेन सुश्मिता सेनचा भाऊ आणि यशस्वी मॉडेल सुद्धा आहे.

First published: May 30, 2020, 2:18 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या