मुंबई, 31 मार्च : बॉलिवूडचे अनेक अभिनेते आणि अभिनेत्यांच्या जोड्या लोकप्रिय आहेत. या कलाकारांना मोठ्या पडद्यावर पाहायला प्रेक्षकाना नेहमीच आवडतं. त्यापैकीच एक जोडी म्हणजे जुही चावला आणि शाहरुख खान. या दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. शाहरुख खान आणि जुही चावला या जोडीवर प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम केले आहे. या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी अप्रतिम आहे तितकीच या जोडीचा ऑफस्क्रीन मैत्रीही खूप छान आहे. जुही आणि शाहरुख किती चांगले मित्र आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. दोघांनी मिळून एक आयपीएल संघही विकत घेतला आहे. यांच्या मैत्रीचाच एक किस्सा लोकप्रिय आहे. काय आहे तो किस्सा जाणून घ्या...
खेळाचे मैदान असो किंवा चित्रपटाचा सेट, हे दोघे अनेकदा एकमेकांची खिल्ली उडवताना, मजा करताना दिसतात. त्याचप्रमाणे शाहरुखची खिल्ली उडवताना अभिनेत्रीने एका शोमध्ये किंग खानची एक सवय उघड केली. खरं तर, किंग खान चित्रपटसृष्टीत त्याच्या कुठेही उशिरा पोहचण्याच्या सवयीमुळे ओळखला जातो. हे कलाकार बहुतेक उशिरा पार्टीत पोहोचतात. असाच घडलेला एक प्रसंग जुहीने सांगितला होता.
सैफ अली खान आणि अमृता सिंगचं नातं का तुटलं? दोघांच्या घटस्फोटामागे 'या' अभिनेत्रीचा होता हात
जुही चावलाने 'झी कॉमेडी शो'च्या सेटवर किंग खानच्या या सवयीचा खुलासा करताना सांगितले की, एकदा अभिनेता रात्री अडीच वाजता त्याच्या घरी पोहोचला होता. अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हाही आमच्या घरी पार्टी असते तेव्हा आम्ही शाहरुख खानला नेहमी आमंत्रित करतो. अशाच एका पार्टी दरम्यान, मी त्याला बोलावले होता आणि प्रत्येकजण शाहरुख खान येणार आहे म्हणून खूप उत्सुक होता, विशेषत: माझ्या कर्मचार्यांना शाहरुख खानसोबत फोटो काढायचे होते.'
ही अभिनेत्री पुढे म्हणाली कि, 'मी त्याला रात्री 11 वाजेपर्यंत यायला सांगितले होते, पण तो म्हणाला की त्याला थोडा उशीरा होईल. पण तो आला तेव्हा रात्रीचे अडीच वाजले होते आणि सर्व पाहुणे निघून गेले होते. मी आधीच झोपले होते आणि सगळं जेवणही संपलं होतं. जेव्हा तुम्ही उशीरा पोहोचता तेव्हा असे होते. असंच शाहरुख सोबत घडलं होतं. '
जुही चावला बद्दल बोलताना कोरिओग्राफर फराह खाननेही किंग खानशी संबंधित एक किस्सा शेअर केला होता. तिने असेही सांगितले होते की शाहरुख अनेकदा 9 वाजता म्हटल्यानंतर 2 वाजता येतो आणि जेव्हा तो अचानक लवकर येतो तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Shahrukh Khan