मुंबई, 26 मार्च: बॉलीवूड अभिनेत्री जुही चावलाने नेहमीच आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगळं ठेवलं आहे. जुही चावला नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहते. ती 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे ही आणखी एक बाब आहे. शाहरुख खान असो की आमिर खान, जुहीने तिच्या काळातील सुपरस्टार्ससोबतच फक्त कामच केले नाही तर त्यांच्यासोबत तिची मैत्रीही चांगली होती. पण, जेव्हा जुहीने 1995 मध्ये बिझनेसमन जय मेहताशी लग्न केले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण तिने जय मेहतांशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला यामागचं कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
जुही चावलाने 1995 मध्ये जय मेहतासोबत लग्न केले. जुहीचे हे पहिले लग्न होते, पण जयचे मात्र दुसरे लग्न होते. जुहीने जयशी लग्न करण्याचा निर्णय घेताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. जुहीने अनेक वर्ष तिचं लग्न सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. त्या दिवसांत ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती, म्हणून तिने तिचे लग्न अनेक वर्षे गुप्त ठेवले. पण, जय मेहतासोबतचं लग्न गुपित ठेवण्यामागचं कारण काय होतं? यामागचे कारणही जुहीनेच उघड केले आहे.
हुबेहूब बॉलिवूड कलाकारांसारखे दिसतात 'हे' सहा जण; चित्रपटसृष्टीत एंट्री घेतली पण अशी झाली अवस्था
अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या जुहीची प्रेमकहाणीही खूपच फिल्मी आहे. जुहीने तिच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठ्या जय मेहताशी अतिशय फिल्मी पद्धतीने लग्न केले. जेव्हा जुही जयला पहिल्यांदा भेटली होती तेव्हा त्यांची पहिली पत्नी सुजाता बिर्ला यांचे निधन झाले होते. सुजाता यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर जय एकटा पडला होता.
1992 मध्ये जुही तिच्या 'करोबार' चित्रपटाचे शूटिंग करत होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन होते, त्यांची जय मेहताशी चांगली मैत्री होती. जय आणि जुहीची पहिली भेट या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती, पण तेव्हा त्यांची फक्त प्राथमिक ओळख होती. त्यानंतर काही वर्षांनी जूही जयला पुन्हा भेटली. पण तेव्हा जुहीला जयच्या पहिल्या पत्नीचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे, हे समजलं. त्यानंतर मात्र तिची त्याच्याशी वागणूक बदलू लागली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली आणि हळू हळू दोघे जवळ येऊ लागले.
जुही आणि जय एकमेकांवर प्रेम करू लागले. दोघांनी लग्नाचा विचार केला, मात्र त्यानंतर जुहीच्या आईचा एका कार अपघातात मृत्यू झाला. या अपघातामुळे जुहीला खूपच धक्का बसला. अशा परिस्थितीत तिला लग्नाबाबत कोणताही निर्णय घेता आला नाही. या दु:खातून बाहेर पडण्यासाठी जयने जुहीला खूप मदत केली. यानंतर दोघांनी 1995 मध्ये लग्न केले. दोघांना जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुले आहेत. दोघेही आता सुखी संसार करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.