मुंबई 6 ऑगस्ट : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra Deol) यांनी आपल्या अभिनयाने मोठी ओळख निर्माण केली आहे. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी अनेक सुपरहीट चित्रपटात काम केलं. त्यामुळे त्यांचे केवळ भारतातच नाही जगभरात चाहते आहेत. एक अभिनेता म्हणूनच नाही एक निर्माता म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. पण एकदा असा प्रसंग घडला होता की, चक्क पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी धर्मेंद्र यांच्या घरासमोर गाडी थांबवली होती.
पाकिस्तानचे माझी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांनी धर्मेंद्र यांच्या घरासमोर गाडी उभी केली होती. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. त्यावेळी त्यांनी देशविदेशातील पंतप्रधानांना तसेच मान्यवरांना त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी बोलवलं होतं. त्यातच पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही निमंत्रण होतं. पण पुन्हा परत जाताना ते आपल्या कार मधून रस्त्याने परतत होते.
फरहान अख्तरने पुरुष नाही तर महिला हॉकी टीमला दिल्या शुभेच्छा; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर
त्यावेळी त्यांना धर्मेंद्र यांचं घर दिसलं, ते पाहताच त्यांनी गाडी थांबवली. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलही होती. त्यांचा हा किस्सा धर्मेंद्र यांनी स्वतः बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होता. याच विषयी बोलताना पुढे ते म्हणाले की, “दिल्लीत माझी आणि शरीफ यांची भेट झाली होती. त्यांनी सांगितलं की, ते भारतातून रस्त्याने पाकिस्तानात परतत होते आणि त्यांनी घरासमोर गाडी थांबवली होती.”
प्रियंका- मेगनची मैत्री कायम; दुराव्याच्या चर्चांना वाढदिवशी असा दिला पूर्णविराम
शरीफ हे धर्मेंद्र यांच्या लाखो चाहत्यांप्रमाणेच एक चाहते आहेत. त्यामुळे त्यांच घर पाहताच त्यांनी गाडी थांबवून ते पाहिलं. धर्मेंद्र यांच्या कट्टर फॅन्सचे असे अनेक किस्से आहेत. एकदा एका दुबईच्या त्यांच्या चाहत्याने त्यांचा फोटो घेऊन व्हिडीओ शेअर केला होता. धर्मेंद्र यांनी स्वतः हा व्हिडीओ शेअर केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.