मुंबई 5 ऑगस्ट : भारताच्या पुरुष हॉकी टीमने तब्बल 41 वर्षांनंतर यश मिळवलं आहे. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये (Tokyo Olympics) पुरुष हॉकी संघाने कास्य पदक (Bronze medal) मायदेशी आणलं आहे. त्यामुळे संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संपूर्ण सोशल मीडिया आणि इंटरनेटवर सध्या मेसेजेसचा पाऊस पडत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही टीमचं कौतुक केलं आहे. पण अभिनेता फरहान अख्तरला (Farhan Akhtar) मात्र यामुळे ट्रोल व्हावं लागलं आहे. पाहा नेमकं काय घडलं.
फरहान अख्तरने देखील सोशल मीडियावरून हॉकी टीमला (Men’s Hocky team India) शुभेच्छा दिल्या. मात्र कोणती ह़ॉकी टीम हे त्याने लक्षात घेतलं नाही. पुरुष नाही तर महिला हॉकी टीमला त्याने शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नेटकरी त्याच्यावर फारच संतापले.
— hari singh chouhan (@harichouhan) August 5, 2021
फरहानला त्याची चूक लक्षात आल्यावर लगेचच त्याने ते ट्वीट डिलीट केलं. ट्वीटमध्ये त्याने लिहिलं होतं की, ‘मुलींनो, तुमचा सार्थ अभिमान आहे. भारतीय टीमने अभूतपूर्व कामगीरी करून चौथ पदक आणलं आहे.’ असं ट्वीट त्याने केलं होतं. त्यामुळे चांगलच ट्रोल व्हाव लागलं.
Honest mistake pic.twitter.com/7B09y0p7BT
— Aman Goel (@Merci_Arsene) August 5, 2021
यानंतर त्याने ट्वीट डिलीट करून पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या. पण तो पर्यत नेटीझन्सनी त्याची पूरती शाळा घेतली.
These guys play athletes in their Biopics. pic.twitter.com/V6H0xkjD6m
— Gabbbar (@GabbbarSingh) August 5, 2021
कोणी म्हटलं 'या माणसाने चित्रपटात खेळाडूची भूमिका केली आणि कोणता संघ जिंकला हे देखील माहित नाही.' तर कोणी म्हटलं, 'हे फक्त चित्रपटातच खेळू शकतात.'
So proud of #teamIndia for showing exemplary fighting spirit and bringing in our 4th medal .. super stuff. #Tokyo2020 #Hockey
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) August 5, 2021
नतंर फरहानने पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Farhan akhtar, Olympics 2021, Sports