मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कपिल शर्माची जागा धोक्यात ? Jr NTR ला बनायचंय होस्ट..

कपिल शर्माची जागा धोक्यात ? Jr NTR ला बनायचंय होस्ट..

लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये आज, दि. २ जानेवारी ‘आरआरआर’ (Junior NTR Films RRR) चित्रपटाची संपूर्ण टीम दिसणार आहे.

लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये आज, दि. २ जानेवारी ‘आरआरआर’ (Junior NTR Films RRR) चित्रपटाची संपूर्ण टीम दिसणार आहे.

लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये आज, दि. २ जानेवारी ‘आरआरआर’ (Junior NTR Films RRR) चित्रपटाची संपूर्ण टीम दिसणार आहे.

मुंबई, 2जानेवारी-लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये आज, दि. २ जानेवारी ‘आरआरआर’ (Junior NTR Films RRR) चित्रपटाची संपूर्ण टीम दिसणार आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यासह अभिनेता राम चरण, ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) आणि आलिया भट (Alia Bhatt) या स्टारकास्टने कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली. या खास एपिसोडचा प्रोमो आला आहे. यामध्ये कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक हे पाहुण्यांसोबत मस्ती करताना दिसत आहेत.

व्हिडिओत कृष्णा अभिषेक ज्युनिअर एनटीआरची फिरकी घेताना दिसत आहे. कृष्णा सेटवर आल्यावर त्याचा गेटअप बघूनच प्रेक्षकांना हसू आवरत नाही. यावेळी कृष्णा ज्युनिअर एनटीआरला म्हणतोय की, "जेव्हा आपण ६० वर्षाचे व्हाल, तेव्हा बस आणि रेल्वेने प्रवास करू नका. तेथे ६० वर्षानंतर सूट मिळते, परंतो आपण तर ज्युनिअरच राहणार आहात." यावर प्रेक्षकांनी हासून दाद दिलेली दिसत आहे.

वाचा-RRR ला मिळाली होती 10 कोटींची अ‍ॅडव्हान्स बुकिंग! परत दिले जाणार तिकिटाचे पैसे?

कपिलची एसएस राजामौली यांच्यावर स्तुतीसुमनं

कपिल शर्माने राजामौली यांना विचारलं की, लॉकडाऊनमध्ये आपण किती चित्रपट लिहले होते? राजामौली सांगतात की, त्यांनी केवळ एकाच चित्रपटाची स्टोरी लिहली होती. यावर आपला एक चित्रपट दहा चित्रपटांच्या बरोबरीचा असतो, अशा शब्दांत कपिलने एसएस राजामौली यांचं कौतुक केलं.

वाचा-Video:विकीला सोडण्यासाठी कतरिना पोहोचली एअरपोर्टवर, दिलं टाइट hug

ज्युनिअर एनटीआरची कपिल शर्माच्या जागी होस्ट बनण्याची इच्छा

ज्युनिअर एनटीआरचं कपिल शर्मा शोमध्ये होस्ट करण्याची इच्छा आहे. याबाबत बोलताना एनटीआर व्हिडिओत दिसत आहे. ज्युनिअर एनटीआर कपिलला म्हणतोय की, माझी इच्छा आहे की, एक दिवस मी तुमच्या जागी असेन आणि तुम्ही अर्चना पूरन सिंह यांच्या जागी बसलेले असाल.

एसएस राजामौली यांना खास अवॉर्ड

व्हिडिओत किकू शारदा दिग्दर्शक एसएस राजामौली यांना एक खास पुरस्कार देताना दिसत आहे. आलियाने या पुरस्काराचं कारण विचारलं तेव्हा किकू सांगतो की, ते या पृथ्वीवरचे एकमेव व्यक्ती होते ज्यांना कटप्पाने बाहुबलीला का मारलं ? हे सर्वात आधी माहिती होतं. किकूच्या या विनोदावर प्रेक्षक मात्र खळखळून हसू लागले.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment