जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / RRR ला मिळाली होती 10 कोटींची अ‍ॅडव्हान्स बुकिंग! पोस्टपोन नंतर परत दिले जाणार तिकिटाचे पैसे?

RRR ला मिळाली होती 10 कोटींची अ‍ॅडव्हान्स बुकिंग! पोस्टपोन नंतर परत दिले जाणार तिकिटाचे पैसे?

RRR ला मिळाली होती 10 कोटींची अ‍ॅडव्हान्स बुकिंग! पोस्टपोन नंतर परत दिले जाणार तिकिटाचे पैसे?

बाहुबली फेम एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘RRR’ मोठा फटका बसला आहे. नुकताच चित्रपटाची रिलीज डेट पुढं ढकलण्यात (RRR postponed) आल्याची माहिती समोर आली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 जानेवारी-   बाहुबली फेम एस.एस. राजामौली   (SS Rajamouli)  यांच्या ‘RRR’ मोठा फटका बसला आहे. नुकताच  चित्रपटाची रिलीज डेट पुढं ढकलण्यात    (RRR postponed)  आल्याची माहिती समोर आली होती. चित्रपट रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने निर्मात्यांना याचा जबरदस्त फटका बसला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तब्बल 16 ते 17 कोटींचा खर्च आला होता. त्यांनतर आता लोकांना झालेल्या नुकसानाबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण या चित्रपटासाठी कित्येक प्रेक्षकांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंग केलं होतं. इतकंच नव्हे तर अमेरिकेतील प्रेक्षकांनीही मोठ्या प्रमाणात बुकिंग केलं होतं. RRR साठी कोट्याविधींचं अ‍ॅडव्हान्स बुकिंग- टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, राजस्थानचे प्रसिद्ध एग्जिबिटर आणि डिस्ट्रीब्यूटर राज बंसल यांनी म्हटलं आहे, की कोरोना आणि पोस्टपोन यामुळे RRR चित्रपटाच्या व्यवसायावर 20 ते 25 टक्के परिणाम झाला आहे. या चित्रपटाला अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात अ‍ॅडव्हान्स बुकिंग मिळाली होती. परंतु आता चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याने त्यांना ही रक्कम परत करावी लागणार आहे. चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 8 ते 10 कोटी रुपये मिळाले होते. परंतु ही तिकिटं रद्द करून आलेला रिफन्ड परत करावा लागणार आहे.

तर दुसरीकडे ट्रेड अ‍ॅनॅलिस्ट अतुल मोहन यांनी म्हटलं आहे, ‘चित्रपट ठरल्या वेळेत रिलीज न झाल्याने डिस्ट्रिब्युटर्सना मोठा फटका बसला आहे. तसेच त्यांनी म्हटलं आहे, जर प्रमोशन नंतर ठरल्या वेळी चित्रपट रिलीज नाही झाला. तर प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता संपून जाते.त्यांनी चित्रपटाबद्दल याआधीच निर्णय घेणं अपेक्षित होतं. कोरोना काळात विविध नियमांमुळे चित्रपटाच्या व्यवसायावर 20 ते 25 टक्के परिणाम होतोच’. देशात वाढत असलेल्या कोरोना प्रकरणांमुळे चित्रपट निर्मात्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती देत सांगितलं आहे, ‘आम्ही आमच्याकडून खूप प्रयत्न केला परंतु परिस्थिती आमच्या आटोक्याबाहेर गेली आहे. आपल्यला माहिती आहे अनेक राज्यांत चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही.आम्ही तुम्हाला वचन देतो की योग्य वेळी आम्ही भारतीय चित्रपटांचं सौंदर्य परत आणू’. आम्ही परत येणार…’ असं म्हणत त्यांनी चाहत्यांसमोर आपलं मत व्यक्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात