जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Video: विकीला सोडण्यासाठी कतरिना पोहोचली विमानतळावर, दिलं टाइट HUG

Video: विकीला सोडण्यासाठी कतरिना पोहोचली विमानतळावर, दिलं टाइट HUG

Video: विकीला सोडण्यासाठी कतरिना पोहोचली विमानतळावर, दिलं टाइट HUG

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल(Vicky Kaushal) या नव्या जोडप्याने लग्नानंतर एकत्र नवीन वर्ष 2022 (New Year 2022) साजरे केले.

  • -MIN READ
  • Last Updated :

ामुंबई, 1 जानेवरी- कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल**(Vicky Kaushal)** या नव्या जोडप्याने लग्नानंतर एकत्र नवीन वर्ष 2022 (New Year 2022) साजरे केले. विकीने त्याच्या व्यस्त वेळापत्रकातूनन वेळ काढत कतरिनासाठी नवीन वर्ष खास बनवण्यासाठी मुंबईला (Mumbai) आला होता. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन झाल्यानंतर परत तो त्याच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी गेला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कतरिना विकीला सोडण्यासाठी मुंबई विमानतळावर**(Mumbai Airport)** आली होती. यावेळी एकमेकांपासून लांब जाण्याचा दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर सहज दिसून येत होते. कतरिना(Katrina Kaif) आणि विकीने (Vicky Kaushal) लग्नाआधी कधीच त्यांच्यातील प्रेम जगजाहीर केलं नाही. लग्नाची माहिती देखील त्यांच्याकडून अधिकृतपणे देण्यात आली नव्हती. लग्न झाल्यानंतर मात्र हनिमूनवरून परत आल्यानंतर ही जोडी पहिल्यांदा पती- पत्नी म्हणून अधिकृतपणे मीडियासमोर आली. लग्न झाल्याची माहिती देखील या जोडींने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत दिली. विकी कौशल सध्या त्याच्या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण या सगळ्यामध्ये तो शूटिंग सोडून लग्नानंतर कतरिनासोबत पहिले नवीन वर्ष 2022 (New Year 2022) साजरे करण्यासाठी घरी पोहोचला. वाचा- विकीला सारा सोबतची बाईक राईड महागात; RTO कारवाईच्या तयारीत कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता दोघांनी देखील तोंडाला मास्क घातले होते. या दोघांचा हा प्रेमळ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कतरिना विकीला घट्ट मिठी मारताना दिसत आहे. दोघांची जोडी लोकांन खूप आवडते. आजपर्यंत जेव्हा जेव्हा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे तेव्हा फक्त फक्त प्रेम आणि प्रेम दिसलं आहे. हेच प्रेम चाहत्यांना देखील आवडते.एका यूजरने लिहिले आहे की ‘हे प्रेम आहे’. दुसऱ्याने लिहिले- ‘त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत आहे’. तर आणखी एकाने लिहिले आहे की, ‘किती गोड…’. दुसर्‍याने लिहिले आहे की, या दोघांच्यातील प्रेम असेच चिरंतन राहो हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे’.

जाहिरात

इंदूरमध्ये विकी करत आहे शूटिंग विकी कौशलने एक पोस्ट लिहित म्हटले होते की,आपण कामावर परतत येत आहे. सध्या तो इंदूरमध्ये लक्ष्मण उत्रेकर यांच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान आहे. इंदूरमध्ये 30 ते 40 दिवसांचे शूंटिग आहे. वाचा- VIDEO: सलमान खानचं गर्लफ्रेंड यूलिया वंतूर आणि EX सोबत न्यू ईयर सेलिब्रेशन? विकी आणि कतरिनाने 9 डिसेंबर रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. दोघांच्या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात