मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

चक्क विवियन रिचर्डला आशा भोसले म्हणाल्या होत्या 'नाना पाटेकर'; अशी होती नीना गुप्ता यांची रिअॅक्शन

चक्क विवियन रिचर्डला आशा भोसले म्हणाल्या होत्या 'नाना पाटेकर'; अशी होती नीना गुप्ता यांची रिअॅक्शन

व्हिडीओत आशा भोसले, विवियन रिचर्ड आणि नीना गुप्ता एकमेकांना भेटले होते तेव्हाच संभाषण ऐकायला मिळत आहे.

व्हिडीओत आशा भोसले, विवियन रिचर्ड आणि नीना गुप्ता एकमेकांना भेटले होते तेव्हाच संभाषण ऐकायला मिळत आहे.

व्हिडीओत आशा भोसले, विवियन रिचर्ड आणि नीना गुप्ता एकमेकांना भेटले होते तेव्हाच संभाषण ऐकायला मिळत आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 30 जून: ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांचं नुकतच ‘सच कहू तो’ (Sach Kahu To) हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. या पुस्तक नंतर अनेक गोष्टींचे खुलासे होत आहेत. तर अनेक जुन्या गोष्टी नव्याने ऐकायला मिळत आहे. त्यातीलच एक म्हणजे प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosale), नीना गुप्ता (Neena Gupta) आणि विवियन रिचर्ड (Vivian Richard) यांची भेट.

सध्या सोशल मीडिया वर एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात आशा भोसले, विवियन रिचर्ड आणि नीना गुप्ता एकमेकांना भेटले होते तेव्हाच संभाषण ऐकायला मिळत आहे. (Neena Gupta book)

एका कार्यक्रमा दरम्यान त्यांची भेट झाली होती. तेव्हा नीना आणि विवियन रिलेशनशीपमध्ये होते. व्हिडिओत प्रसिद्ध गायिका आशा भोसले या विवियन ला पाहिल्यानंतर तो अभिनेते नाना पाटेकर यांच्यासारखा दिसतो असं म्हणतात. पण नीना मात्र अशा यांच्या या वक्तव्यावर जास्त सहमती दर्शवत नाहीत. हा जुना व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

" isDesktop="true" id="572543" >

व्हिडिओत पुढे नीना ही गोष्ट विवियनला सांगते की, “आमच्या इथे एक अभिनेता आहे, त्या म्हणत आहेत की तू त्याच्यासारखा दिसतो.” पुढे आशा नीना ला विचारतात की “काय हे दोघे एकमेकांना भेटले आहेत?” त्यावर नीना नाही असं उत्तर देतात.

राज कौशल यांची ही पार्टी ठरली शेवटची; अवघ्या दोनच दिवसात आनंदावर विरजण

दरम्यान 80 च्या दशकात अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीज क्रिकेटर विवियन रिचर्ड यांच्या नात्याची विशेष चर्चा होती.  दोघांनी कधीही लग्नं केलं नाही पण आजही त्यांच्या नात्यावर अनेक गोष्टी ऐकायला मिळतात.

विवियन हा आधीच विवाहित होता त्यामुळे नीना आणि त्याच कधीच लग्नं होऊ शकलं नाही. परंतु मसाबा गुप्ता (Masaba Gupta) ही मुलगी त्यांना झाली. नीना यांनी एकटीने मसाबाचा सांभाळ केला होता. तर आता ती प्रसिद्ध डिझायनर आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment