मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

...आणि जखमी अवस्थेत अमिताभ बच्चन पोहोचले ऋषी कपूर यांच्या लग्नात! वाचा नक्की काय घडलं

...आणि जखमी अवस्थेत अमिताभ बच्चन पोहोचले ऋषी कपूर यांच्या लग्नात! वाचा नक्की काय घडलं

असं नेमकं काय घडलं की, ऋषी कपूर यांच्या लग्नात अमिताभ जखमी अवस्थेत पोहोचले होते.

असं नेमकं काय घडलं की, ऋषी कपूर यांच्या लग्नात अमिताभ जखमी अवस्थेत पोहोचले होते.

असं नेमकं काय घडलं की, ऋषी कपूर यांच्या लग्नात अमिताभ जखमी अवस्थेत पोहोचले होते.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 8 मे : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांनी 30 एप्रिलला जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची माहिती सर्वात आधी अमिताभ बच्चन यांनी दिली होती. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटरवरून ऋषी कपूर आता या जगात राहिले नसल्याचं सांगितलं होतं. या एका वाक्यातूनही त्यांना झालेलं दुःख स्पष्ट दिसत होतं. अशातच आता ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीचे काही किस्से सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावरुन समजतं की या दोघांमध्ये किती घनिष्ठ मैत्री संबंध होते.

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर अमिताभ यांनी एक ब्लॉग लिहिला होता ज्यात त्यांनी ऋषी कपूर यांच्या लग्नातले काही किस्से शेअर केले होते. यात त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की ऋषी कपूर यांच्या लग्नात अमिताभ जखमी अवस्थेत पोहोचले होते. ऋषी कपूर यांच्या लग्नाच्या काही दिवस आधीच अमिताभ चेन्नईमध्ये त्यांच्या एका सिनेमाचं शूटिंग करत होते. या दरम्यान एका अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले होते. ज्यामुळे त्यांना नीतू आणि ऋषी कपूर यांच्या लग्नात हाताला पट्टी बांधूनच सहभागी व्हावं लागलं होतं.

भाईजान पुन्हा एकदा ठरला देवदूत! आता भूकेल्यांसाठी अन्न पुरवणार अन्न, पाहा VIDEO

बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, त्यावेळी ते एका सिनेमाच्या गाण्याचं शूट करत होते. ज्यात दोरीच्या मदतीनं स्लाइड करत खाली यायचं होतं. मात्र दुर्दैवानं त्यांचा हात सुटला आणि ते खाली पडले. ज्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी अमिताभ यांच्या हाताला प्लास्टर केलं. पण त्यावेळी अमिताभ ही दुखापत अधिक गंभीर तर ठरणार नाही ना या विचारानं घाबरून गेले होते.

अमिताभ यांना दुखापत झाल्यानंतर सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यांच्या हाताला काही ठिकाणी टाके सुद्धा घालण्यात आले होते. त्यावेळी नीतू आणि ऋषी कपूर यांचं लग्न सुद्धा होतं. त्यामुळे अशाच अवस्थेत मित्राच्या लग्नासाठी अमिताभ बच्चन मुंबईला रवाना झाले आणि हाताला पट्टी बांधलेल्या अवस्थेतच ते लग्नात सहभागी झाले.

(संपादन- मेघा जेठे)

ऋषी कपूर यांनी धडाक्यात लावलं होतं लेकीचं लग्न, असं पार पडलं कन्यादान

'रामायण' हा सर्वाधिक पाहिलेला शो नाही? सर्वात मोठा रेकॉर्ड वादाच्या भोवऱ्यात

First published:

Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Rishi kapoor