मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'रामायण' हा सर्वाधिक पाहिलेला शो नाही? सर्वात मोठा रेकॉर्ड वादाच्या भोवऱ्यात

'रामायण' हा सर्वाधिक पाहिलेला शो नाही? सर्वात मोठा रेकॉर्ड वादाच्या भोवऱ्यात

दूरदर्शननं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन रामायण हा जगात सर्वाधिक लोकांनी पाहिलेला शो ठरल्याची माहिती दिली होती.

दूरदर्शननं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन रामायण हा जगात सर्वाधिक लोकांनी पाहिलेला शो ठरल्याची माहिती दिली होती.

दूरदर्शननं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन रामायण हा जगात सर्वाधिक लोकांनी पाहिलेला शो ठरल्याची माहिती दिली होती.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 7 मे : दूरदर्शनवर रामनंद सागर यांचा रामायण हा शो सुरू झाल्यापासून चर्चेत आहे. सोशल मीडियावरही या शोबद्दल कमालीची क्रेझ पाहायला मिळाली. याच कारणामुळे कदाचित या शोनं एक नवा रेकॉर्ड सुद्धा तयार केला. नुकताच हा शो जगातला सर्वाधिक लोकांनी पाहिलेला शो ठरला. मात्र या रेकॉर्डवर सध्या काही सवाल उपस्थित केले जात आहेत. ज्यावरुन वादही झालेले पाहायला मिळत आहेत.

2 मे 2020 ला दूरदर्शननं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन रामायण हा जगात सर्वाधिक लोकांनी पाहिलेला शो ठरल्याची खुशखबर दिली होती. दूरदर्शननं ट्विट केलं होतं की, रामायण या शोनं जागतिक रेकॉर्ड केला आहे. ही शो जगातला सर्वाधिक लोकांनी पाहिलेला शो ठरला आहे. या ट्वीटसोबत त्यांनी काही आकडे सुद्धा प्रसिद्ध केले होते. या ट्वीटमध्ये सांगण्यात आलं होतं की, 16 एप्रिलला प्रसारित करण्यात आलेला रामायणचा एपिसोड 7 कोटी 70 लाख लोकांनी पाहिला आहे. यासोबत या शोनं गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेचं रेकॉर्ड सुद्धा तोडलं होतं.

संजय दत्त ते शाहरुख खान... दारूच्या नशेमुळे वादात अडकले होते हे बॉलिवूड स्टार्स

या ट्वीटनंतर आता लाइव्ह मिंटच्या एका रिपोर्टनं रामायणच्या रेकॉर्डवर सवाल उपस्थित केले आहेत. या रिपोर्टमध्ये दूरदर्शनचा रामायण हा शो सर्वाधिक पाहण्यात आलेला शो ठरल्याचा दावा खोटा ठरवण्यात आला आहे. तसेच अमेरिकनं सीरिज MASH चा शेवटचा एपिसोड 10 कोटी 60 लाख लोकांनी पाहिला होता असा दावा सुद्धा या रिपोर्टमध्ये करण्यात आला असून यानुसार रामायण हा शो सर्वाधिक पाहिला गेलेला शो नाही असं त्यांनी म्हटलं आहे. रिपोर्टनुसार मॅशचा हा शेवटचा एपिसोड 28 फेब्रुवारी 1983 मध्ये प्रसारित करण्यात आला होता.

दरम्यान या प्रकरणात रिपब्लिकच्या एका रिपोर्टमध्ये सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार हा दूरदर्शन या रिपोर्टच्या विरोधात आपल्या स्टेटमेंटवर कायम आहे. त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, टीव्ही रेटिंग्स नाही तर मोबाइल टीव्ही सेवा Jio TV, MX Player या प्लॅटफॉर्मवरुनही लोक डीडी नॅशनलशी जोडले गेले आहेत.

(संपादन- मेघा जेठे.)

कधीकाळी एकता कपूरशी लग्न करायला तयार झाला होता करण जोहर, पण...

First published: